विष प्राशन केलेल्या एसटी कर्मचा-याचा मृत्यू; खामगाव हादरले
मृत्यू SaamTv

विष प्राशन केलेल्या एसटी कर्मचा-याचा मृत्यू; खामगाव हादरले

राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी आर्त हाक व मागणी एसटी कर्मचारी करीत आहे.

बुलडाणा : एसटी कर्मचारी (msrtc employee) यांचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी खामगाव येथील एसटी विभागात काम करणाऱ्या विशाल अंबालकर या कर्मचाऱ्याने नुकतेच विष प्राशन केले होते. दरम्यान उपचार्थ दाखल केलेल्या अंबालकर यांचा मृत्यू झाल्याने एसटी कर्मचा-यांनी हळहळ व्यक्त केली.

मृत्यू
ठाकरे- पवार सरकारला एक दिवस महाराष्ट्र सस्पेंड करेल : साेमय्या

गेल्या काही दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी शासनात विलीनीकरणाच्या भुमिकेवर ठाम राहिले आहेत. त्यासाठी पुकारलेल्या संपात अनेक जण आत्महत्या करु लागले आहेत. खामगाव येथील विशाल अंबालकर हे देखील संपात सहभागी झाले हाेते. दाेन दिवसांपुर्वी अस्वस्थ असलेले अंबालकर यांनी विष प्राशन केले. त्यांना तात्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

परंतु त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने तातडीने रात्री उशिरा अकोला येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. उपचारा दरम्यान अंबालकर यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एसटी कर्मचारी आत्महत्येत पुन्हा एका कर्मचा-याची आत्महत्येची भर पडली आहे. जिल्ह्यातील एसटी कर्मचारी पुन्हा टोकाचं पाऊल उचलत असल्याचं स्पष्ट होत आहे. राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी आर्त हाक व मागणी एसटी कर्मचारी करीत आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com