सातारा : एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

कमी वेतन व संपामुळे ते तणावाखाली होते असा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
सातारा : एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
santosh shinde

सातारा : गेल्या १० दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. साताऱ्यात मंगळवारी एसटी कर्मचा-याने अधिका-यास मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली हाेती. त्यापाठाेपाठ मेढा एसटी डेपोतील कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती देखील समाेर आली आहे. संतोष वसंत शिंदे (वय ३४, रा. आसगाव ता. सातारा) असे मृत पावलेल्या कर्मचा-याचे नाव आहे. msrtc employee passes away medha satara latest marathi news

santosh shinde
MRF MoGrip FMSCI इंडियन नॅशनल रॅलीत तनिका शानभाग द्वितीय

संतोष शिंदे यांची कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे. तीन वर्षांपूर्वी ते मेढा एसटी डेपोमध्ये रुजू झाले होते. यापुर्वी लॉकडाऊन लागले. आता कर्मचा-यांचा संप सुरू झाला. यामुळे तुटपुंज्या पगारात जगायचे कसे या विचाराने ते हताश झाले होते.

गेल्या आठ दिवसापासून ते तणावाखाली होते असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. काल मध्यरात्री त्यांना त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तात्काळ येथील जिल्हा रुग्णालायत उपचारासाठी दाखल केले. परंतु त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी नातेवाईकांना सांगितले.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com