उस्मानाबाद : एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याचं आवाहन राज्य शासनाकडून करण्यात येत आहे.
उस्मानाबाद : एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
kiran ghodke

- कैलास चाैधरी

उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. हा संपावर तोडगा निघालेला नाही. राज्य सरकारने संप तातडीने मागे घ्यावा असे आवाहन कर्मचा-यांना केले आहे. जे कर्मचारी कामावर हजर हाेत नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील एसटी कर्मचारी किरण घोडके यांचा मृत्यू झाला. किरण यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. इतर सहकाऱ्यांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे घोडकेंनी धसका घेतल्याचा दावा त्याच्या सहका-यांनी केला आहे.

kiran ghodke
पर्यटकांनाे! १०० रुपयांत करा महाबळेश्वर, प्रतापगड दर्शन

घाेडके याची अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झाली होती. लॉकडाउन आणि संप काळात त्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली हाेती. कुटुंब चालविण्यासाठी तो काही वेळेस खासगी वाहनावर देखील काम करत होता. राज्य शासनाने कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीने त्याला हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच मृत्यू झाला असल्याचा दावा त्याचे सहकारी करीत आहेत.

दरम्यान एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेला संपामुळे सामान्य लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी खासगी वाहतुकदार प्रवाशांकडून जादा पैशांची आकारणी करीत असल्याचे दिसत आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com