एसटी कर्मचारी संपावर आजही ठाम; सांगली- पुणे शिवशाहीची सेवा सुरु

पुण्याकडे जाणाऱ्या शिवशाहीची वाहतूक नियमितपणे सुरू आहे.
एसटी कर्मचारी संपावर आजही ठाम; सांगली- पुणे शिवशाहीची सेवा सुरु
shivshai bus

सांगली ST Strike News : वेतनवाढीचा निर्णय मान्य नसल्याने आंदोलनास बसलेले एसटी (msrtc) कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे सांगली बस स्थानकाच्या आवारात एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचे आंदोलन आजही (गुरुवार) सुरू ठेवले आहे. परिणामी छाेट्या वाहनातून प्रवाशांना सांगली जिल्हा अंतर्गत सेवा दिली जात आहे.

shivshai bus
राजकारणात संधी मिळत नसते, ती हिसकावून घ्यावी लागते : शरद पवार

दुसरीकडे काही एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्ह्यातील आणि पुण्याकडे जाणाऱ्या शिवशाहीची वाहतूक नियमितपणे सुरू ठेवली आहे. पुण्याला जाण्यासाठी सुमारे ५१५ रुपये इतका तिकीट दर आहे. जिल्ह्यातील वाहतूक ६० बसेसच्या मदतीने सुरू आहे. मात्र पूर्ण क्षमतेने अजूनही एसटी बसची वाहतूक सुरू झालेली नाही. 

केवळ जिल्ह्यातील काही डेपोतील एसटी बसची वाहतूक सुरू आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्याच्या बाहेर अजून एकही बस जाऊ शकलेली नाही. डेपोत खाजगी काळी पिवळी गाडी आणि बस या दोन्ही वाहनांच्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा उपल्बध करुन देण्यात आली आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com