सांगली, सातारा बस स्थानाकात शुकशुकाट; खासगी वाहतुकदार सुसाट

sangli bus station
sangli bus station

सांगली : सांगलीत एसटी कर्मचाऱ्यांकडून स्वयंस्फूर्तीने संपाचे हत्यार उपसले आहे. यामुळे आज (साेमवार) पहाटेपासून सांगली आगारात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस बंदोबस्तात सांगली आगारातून एसटी बसेस सोडल्या जात आहेत. पहाटेपासून कामावर येणाऱ्या एसटी कामगारांनी गांधींगिरी सुरू केली आहे. कामावर येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना फुल देऊन कामावर न येण्याची विनंती केली आहे.

sangli bus station
सोमवार, मंगळवार शाळा, महाविद्यालयास सुटी; मुख्यमंत्र्यांची घाेषणा

पहाटेपासून लांब पल्ल्याच्या एसटी बसेस या बंदोबस्तात रवाना केल्या जात आहेत. या आंदोलनात एसटी कामागारांसोबत भाजपा नेते पृथ्वीराज पवार हे सुद्धा सहभागी असल्याने सांगली आगारात तणावाची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांचा मोठा बंदोबस्त एसटी स्टॅण्ड परिसरात तैनात आहे.

दरम्यान एसटीच्या विलीनीकरण करण्याच्या मागण्यांसाठी एसटी कामगारांनी सांगली आगाराचे कामकाज बंद पडले आहे. कोणत्याही परिस्थितीत माघार नाही आता आर या पार ची लढाई आहे असा इशारा देत एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामुळे सकाळपासून दहा लांब पल्याच्या बस फेऱ्या कर्मचाऱ्यांअभावी रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सातारा बस स्थानकात शुकशुकाट

सातारा जिल्ह्यात देखील एसटी कर्मचा-यांचा संप सुरु झालेला आहे. सातारा शहरातील मुख्य बसस्थानक परिसरातून एक ही बस परगावी रवाना झालेली नाही. एसटी कर्मचा-यांच्या संपाचा फायदा खासगी बस वाहतुकदारांनी घेण्यास प्रारंभ केला आहे. मुंबई आणि पुणे येथे जाणा-यांची संख्या लक्षात घेता खासगी बसेस माेठ्या प्रमाणात बस स्थानाकाबाहेर लावण्यात आल्या आहेत. त्यातून प्रवासी आपआपल्या इच्छित स्थळी जाताहेत.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com