मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; तब्बल ३ तास चर्चा

दोघांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाल्याची माहिती समोर यते आहे.
Uddhav Thackeray/Anant Ambani
Uddhav Thackeray/Anant AmbaniSaam Tv

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे पुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भेट घेतली आहे. दिवाळीनिमित्तानं ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून भाजप (BJP) आणि मनसे या दोन पक्षांमधील जवळीक वाढली आहे. त्यातच आज दिवाळीनिमित्ताने मनसेच्या दीपोत्सवात दादर येथील शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे एकाच मंचावर आले. (Anant Ambani meet Uddhav Thackeray)

Uddhav Thackeray/Anant Ambani
Petrol Diesel : महाराष्ट्रसह राजस्थानमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी झेप? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

दिवाळीत झालेल्या या राजकीय धमाक्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे मातोश्रीवर मोठी घडामोड घडली आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि अनंत अंबानी या दोघांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाल्याची माहिती समोर यते आहे. या भेटीचा कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र ही भेट दिवाळीनिमित्तानं सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे.

यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. रात्री 8 वाजून 20 मिनिटानी अनंत अंबानी यांचा ताफा मातोश्री वर दाखल झाला. त्यानंतर तब्बल 3 तासांनी म्हणजेच रात्री 11.30 वाजताच्या सुमारास अनंत अंबानी मातोश्रीवरुन बाहेर पडले. अंबानी आणि ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा सुरू होती हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र,असे असले तरी देशातील एका बड्या उद्योगपतीच्या मुलगाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतल्याने या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com