Palghar Accident: सायरस मिस्त्रींचा अपघाती मृत्यू झाला, तिथेच २०२२ मध्ये आतापर्यंत गेलेत २६ बळी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील महाराष्ट्राच्या बाजूने तीन धोकादायक पट्ट्यांमध्ये जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत २६२ अपघात झाले आहेत, ज्यात ६२ जणांचा मृत्यू झाला, ७८ जण गंभीर जखमी झाले, तर ७३ जण किरकोळ जखमी झाले.
Palghar Accident, Cyrus Mistry Death News
Palghar Accident, Cyrus Mistry Death News saam tv

मुंबई: टाटा सन्सचे (Tata Group) माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं काही दिवसापूर्वी अपघातात निधन झाले. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. त्यांच्या मृत्यूनंतर पालघरमधील महामार्गाची चर्चा सुरू आहे. आता या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी नवी माहिती दिली आहे.

महामार्ग वाहतूक पोलिसांच्या (Police) आकडेवारीनुसार, मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या तीन भागांवर दर महिन्याला सरासरी सात जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो, याच परिसरात सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला होता. मुंबई ते चारोटी या पट्ट्यात महिन्याला सरासरी ३२ अपघात होतात, अशी माहिती समोर आली आहे.

Palghar Accident, Cyrus Mistry Death News
Cyrus Mistry : सायरस मिस्त्री कोण होते? TATA ग्रुपशी त्यांचे काय संबंध होते?

वर्सोवा पुलापासून ते चारोटीपर्यंतचा मुंबई-चारोटी हा महामार्ग चिंचोटी, मनोर आणि चारोटी या तीन महामार्ग वाहतूक पोलीस ठाण्यांच्या अखत्यारीत येतो. या संपूर्ण भागात या वर्षी ऑगस्टपर्यंत एकूण २६२ अपघात झाले, या ६२ जणांनी आपला जीव गमवला आहे, तर ७८ जणांना गंभीर आणि ७३ जणांना किरकोळ दुखापत झाली.

महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारोटी महामार्ग वाहतूक पोलिसांच्या अखत्यारीत येणाऱ्या वाडा खडकोना ते आच्छाड या ५१ किलोमीटरच्या महामार्गावर या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत एकूण ७७ अपघात झाले असून यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४ जण गंभीर जखमी झाले आणि २९ जण किरकोळ जखमी झाले. याच भागात सूर्या नदीच्या पुलाजवळ मिस्त्री यांच्या कारला अपघात झाला होता.

Palghar Accident, Cyrus Mistry Death News
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या कारला अपघात

याच कालावधीत, विरार फाटा ते वाडा खडकोना या ४८ किमी लांबीच्या मनोरमध्ये १०० अपघात झाले ज्यात ११ जणांचा मृत्यू झाला, २७ जण गंभीर जखमी झाले आणि ३२ जण किरकोळ जखमी झाले. तसेच दहिसर ते विरार फाटा या २७.५ किमीच्या चिंचोटी पट्ट्यात ८५ अपघात यात २५ जणांचा मृत्यू झाला, तर २७ गंभीर जखमी आणि १२ किरकोळ जखमी झाले.

सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर, महामार्ग वाहतूक पोलीस (Police) अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र-गुजरात सीमेजवळील दहिसर टोल प्लाझा ते आचड या महामार्गाचे ऑडिट केले आहे. महाराष्ट्र महामार्ग वाहतूक पोलिसांनी महामार्गाच्या प्रभारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) प्रकल्प संचालकांनाही पत्र दिले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com