Mumbai Crime : चुलत भावाचं बहिणीसोबत संतापजनक कृत्य; तणावातून पीडितेन उचललं टोकाचं पाऊल, काळीमा फासणारी घटना

Mumbai Crime : या प्रकरणी पोलिसांनी पीडितेला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या सख्खा चुलत भावाला अटक केली आहे.
Mumbai Crime
Mumbai CrimeSaam tv

Mumbai Crime : मुंबईत बहिण भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. कुर्ला येथे २१ वर्षीय आरोपीने १४ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे तणावात असलेल्या तरुणीने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या सख्खा चुलत भावाला अटक केली आहे. विनोबा भावे असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २१ वर्षीय आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून मुलीवर अत्याचार करत होता. त्यामुळे पीडित मुलगी मानसिक तणावात होती. या तणावातून तिने यापूर्वी देखील बहिणीच्या लग्नादरम्यान एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी ती थोडक्यात बचावली.

Mumbai Crime
Oscar Awards 2023: RRR ने इतिहास रचला! 'नाटू नाटू' गाण्याने पटकावला ऑस्कर अवॉर्ड; देशासाठी अभिमानाचा क्षण..

दरम्यान आरोपीकडून होत असलेला त्रास सुरुच असल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेऊन काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. या प्रकरणात तपास करताना पोलिसांना पीडित मुलीने लिहिलेली सुसाइड नोट सापडली. त्यात तिने भावाने केलेल्या अत्याचाराबाबत उल्लेख केला होता. (Latest Marathi News)

या प्रकरणात सबळ पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी असलेल्या नराधम भावाला अटक केली आहे. आरोपीवर कलम 354, 305 भा.द.वि. सह कलम 8, 12, 18 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Crime
Oscar Awards 2023: RRR ने इतिहास रचला! 'नाटू नाटू' गाण्याने पटकावला ऑस्कर अवॉर्ड; देशासाठी अभिमानाचा क्षण..

१७ वर्षीय मुलीवर दोन नराधमांकडून अत्याचार

राज्यात एकीकडे महिलांवरील अत्याचाराविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात असताना दुसरीकडे मुंबईतून आणखी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. वांद्रे परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी बलात्कार (Crime News) केला आहे. आरोपींनी १७ वर्षीय मुलीला गुंगीचे औषध दिले आणि त्यानंतर वांद्रे येथून तिचं अपहरण करून विरारच्या वज्रेश्वरी परिसरात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.

नराधम आरोपी इतक्यावर थांबले नाही. त्यांनी तिच्यावर बलात्कार करताना तिचे नग्न व्हिडीओ देखील बनवले. हेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी पीडितेच्या कुटुंबीयांवर दबाव टाकला. याबाबत कुणाला सांगितल्यास पीडितेला तसेच तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान आरोपींचं कृत्य दिवसेंदिवस वाढत असल्याने पीडितेसह तिच्या आईने वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल करत दोन नराधमांना अटक केली आहे. आरोपींविरोधात पोलिसांनी बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com