Mumbai Goa Expressway : कशेडी घाटात भीषण अपघात; तब्बल १५० फूट खोल दरीत कोसळला ट्रक

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक तब्बल १५० फूट दरीत कोसळला.
Mumbai Goa Expressway Accident
Mumbai Goa Expressway Accident Saam TV

मुंबई : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात एका मालवाहू ट्रकला भीषण अपघात झालाय. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक तब्बल १५० फूट दरीत कोसळला. या अपघातात चालक गंभीरित्या जखमी झाला असून त्याला तातडीने मुंबईच्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Mumbai Goa Expressway Accident Latest News)

Mumbai Goa Expressway Accident
Bullock Cart Race Ban : आयाेजकांनाे ! बैलगाडा शर्यतींवर आली बंदी; जाणून घ्या कारण

प्राप्त माहितीनुसार आज सकाळी १० वाजेच्या सुमारास भोगाव गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, ट्रक अंदाजे १५० फूट दरीत कोसळला. हा ट्रक आंध्र प्रदेशातील रोहा MIDC मध्ये क्लोरीन गॅसचे सिलेंडर घेऊन हा ट्रक जात होता. Mumbai Goa Expressway Truck Accident)

दरम्यान, कशेडी घाटातील भोगाव हद्दीतील तीव्र उतारावर ट्रक आला असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट १५० फूट दरीत जाऊन कोसळला. या भीषण अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ट्रकचालकाला रुग्णालयात दाखल केलं.ॉ

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com