टाेल आकारणी बंद करा! अन्यथा...

टाेल आकारणी बंद करा! अन्यथा...
poladpur

- राजेश भोस्तेकर

रायगड : मुंबई गोवा महामार्गाचे mumbai goa highway अकरा वर्षांपासून रखडलेले काम लवकर व्हावे, हा महामार्ग जागतिक दर्जाच्या व्हावा त्याच बरोबर सर्व सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी पुकारलेल्या श्रद्धांजली साखळी आंदोलनाला आज (रविवार) सकाळी पोलादपुरात प्रारंभ झाला. या आंदाेलनात माेठ्या संख्येने लाेक सहभागी हाेऊ लागले आहेत.

या आंदोलनामध्ये हजारो कोकणवासीय सहभागी झाले आहेत. हातात काळे झेंडे, खांद्याला काळ्या फित लाऊन शासनाचा निषेध या ठिकाणी करण्यात येत आहे. शासनाने लवकरात रस्त्याचे काम पुर्ण करावे अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली जात आहे.

poladpur
Paralympics : १९ पदकांवर माेहाेर उमटविणारे हे आहेत चॅम्पियन्स

पोलादपूर येथील महामार्गावर आंदोलन कर्ते हातात फलक घेऊन उभे राहिले आहेत. राज्याचे माजी सचिव द. म. सुखथनकर हे नेतृत्व करीत आहेत. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी पाेलिस बंदाेबस्त लावण्यात आला आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com