
म्हसवड : म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळशिरस रोडवर गाडेकर वस्तीनजीक मुंबई (Mumbai) येथील सोने-चांदीचे व्यापारी अकलूज येथे त्यांच्या कारमधून जात असतानाच, दोघांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले.
दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी व्यापारी कुमावत यांना पिस्तुलचा धाक दाखवला. त्यांच्याकडील १५ ते २० लाख रुपये किंमतीचे सोने लुटून पोबारा केला. या घटनेमुळं म्हसवड परिसरात व्यापारी वर्गात कमालीची भीती पसरली आहे. (Mhaswad Crime News in Marathi )
मुंबई येथील कुमावत नावाचे सोने-चांदीचे व्यापारी आपल्या कारमधून अकलूज येथे निघाले होते. तेथे त्यांची सोन्याची पेढी आहे. त्याठिकाणी निघाले असताना सांयकाळी साडेपाचच्या सुमारास म्हसवडवरून ते माळशिरस रोडने अकलूजला निघाले. त्याचवेळी गाडेकर वस्तीजवळ दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी कारसमोर दुचाकी आडव्या घातल्या. कार थांबवली असता, एकाने त्याच्याजवळील पिस्तुल काढले. दमदाटी करून कुमावत यांच्याजवळील १५ ते २० लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लुटून (Robbery) त्यांनी पोबारा केला.
या घटनेची माहिती म्हसवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांना मिळाल्यानंतर त्यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपास सुरू केला. माळशिरस परिसरात त्या चोरट्यांचा शोध सुरू होता. या घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.