भाजपा नगरसेवकांची याचिका फेटाळली; अपात्रतेची टांगती तलवार

भाजपा नगरसेवकांची याचिका फेटाळली; अपात्रतेची टांगती तलवार
Court Order

माथेरान : शिवसेनेतून भाजपच्या गोटात गेलेल्या दहा नगरसेवकांना नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने जबरदस्त चपराक दिली. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेली अपात्रतेची नोटीस रद्द करावी अशी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. Court Order यामुळे आता या भागात पुन्हा एकदा काेणते राजकीय रंग पाहायला मिळणार याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे. (mumbai-high-court-rejected-plea-bjp-corporators-shivsena-matheran-news)

माथेरान पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे निवडणूक लढवून विजयी झालेले नऊ नगरसेवक आणि सेनेने स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त केलेले चंद्रकांत जाधव अशा दहा नगरसेवकांनी निवडणुकीनंतर भाजप पक्षात प्रवेश केला. या दहा नगरसेवकांनी पक्षांतर केल्यानंतर २१ जून २०२१ रोजी प्रभारी जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरविकास विभाग, रायगड यांनी त्या सर्व दहा नगरसेवकांना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ अन्वये नोटीस बजावली होती.

या नाेटीसाला भाजपच्या गटात गेलेल्या दहा नगरसेवकांनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. महाराष्ट्र शासन, रायगड जिल्हाधिकारी, माथेरान नगरपरिषदेचे शिवसेना गटनेते प्रसाद सावंत, शिवसेना सचिव अनिल देसाई, माथेरान मुख्याधिकारी यांना या भाजपच्या गोटात शिरलेल्या नगरसेवकांनी याचिकेत प्रतिवादी केले होते.

२१ जून २०२१ रोजी या नगरसेवकांना बजावलेली सुनावणी नोटीस नियमाला अनुसरून दिली नाही तसेच राजकीय दबावाखाली सुनावणी लावण्यात आली असे याचिकेत नमूद करून त्यांनी उच्च न्यायालयाची दिशाभूल आणि वेळकाढूपणासाठी प्रयत्न केला.

Court Order
भंडा-यात ट्रकने दुचाकीला ठाेकरले; युवकाचा मृत्यू

या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे नुकतीच झाली. या खंडपीठाने बंडखोरी करून भाजपच्या गोटात शिरलेल्या दहा नगरसेवकांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे अपात्र होऊ नये यासाठी त्यांनी केलेली धडपड अपयशी ठरली आहे. आता माथेरानमध्ये नेमके काेणते राजकीय रंग पाहायला मिळणार याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com