कोल्हापूरचा व्यापारी अडकला हनीट्रॅपमध्ये; उकळले कोट्यवधी

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका महिला फॅशन डिझायनरचा देखील समावेश
कोल्हापूरचा व्यापारी अडकला हनीट्रॅपमध्ये; उकळले कोट्यवधी
कोल्हापूरचा व्यापारी अडकला हनीट्रॅपमध्ये; उकळले कोट्यवधी Saam Tv

मुंबई - गुन्हे शाखेने हनी ट्रॅप लावून बडे उद्योगपती आणि व्यावसायिकांकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका महिला फॅशन डिझायनरचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.  लुबना वझीर (४७), अनिल चौधरी (४२) आणि मनीष सोदी (४८, सर्व रा अंधेरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

हे देखील पहा -

लुबना वजीरच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी तिच्याकडे २९ लाख रुपयांची रोख रक्कम, तर ७ मोबाईल फोन, २ चारचाकी गाड्या आणि ८ लाखांहून अधिक किमतीचे दागिने सापडले आहेत. लुबना वजीर मुंबईतील जुहू, वांद्रे लोखंडवाला ते गोव्यापर्यंत किटी पार्ट्या करत असे. या माध्यमातून लुबना अनेक लोकांशी मैत्री करत होती. लुबनाने आतापर्यंत  शेकडो लोकांना चुना लावला आहे. आता पोलीस प्रत्येक पीडितापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

कोल्हापूरचा व्यापारी अडकला हनीट्रॅपमध्ये; उकळले कोट्यवधी
Pune Crime -मित्राने केला अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

व्यापारी झाला हनी ट्रॅपचा बळी?

२०१६ साली कोल्हापूर जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याची गोव्यातील एका व्यक्तीशी ओळख झाली आणि दोघेही बोलू लागले. त्यानंतर २०१९ मध्ये हा व्यापारी अंधेरी परिसरात कामासाठी आला होता. आरोपीने व्यापाऱ्याची फायानान्सरसोबत मीटिंग असल्याचे सांगून आपल्या दोन मैत्रिणींना एका  हॉटेलच्या खोलीत भेटायला पाठवले. आपण कामात व्यस्त असल्याचे सांगत, येणे शक्य नसल्याचा खोटा निरोप फायनान्सरच्या नावे दिला.

 यानंतर काही वेळात एक महिला खोलीतून निघून गेली तर दुसरी महिला रूम मध्येच होती. थोड्या वेळाने दुसऱ्या महिलेने  दारावरची बेल वाजवली. व्यापाऱ्याने दरवाजा उघडताच दुसरी महिला वॉशरुममधून बाहेर आली, मात्र त्यावेळी तिच्या अंगावर कपडे नव्हते, तिने एक ब्लँकेट गुंडाळले होते. व्यापाऱ्याने आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून ती महिला रडू लागली.

दुसऱ्या महिलेने तात्काळ त्याच अवस्थेत व्हिडिओ बनवला. त्यानंतर त्याने आधी व्यावसायिकाला धमकावले, त्यानंतर व्हिडिओच्या आधारे त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. २०१९ पासून आतापर्यंत या लोकांनी व्यावसायिकाकडून ३ कोटी २६ लाख रुपये उकळले. अखेर व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींची ओळख पटवण्यास सुरुवात केली. १८ नोव्हेंबर रोजी आरोपींनी व्यावसायिकाकडे १७ लाखांची मागणी केली होती.व्यावसायिकाला एका कॉफी शॉपमध्ये पैसे देण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तीन आरोपींना अटक केली. तर अन्य एक महिला फरार असून पोलीस  तिचा शोध घेत आहेत .

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com