
Viral Video : हेल्मेट शक्यतो दुचाकीस्वार वापरतात. वाहन चालवताना अपघात झाल्यास मृत्यू होऊ नये यासाठी हेल्मेट वापरले जाते. दुचाकीवरून प्रवास करताना अनेकदा चालकाचा तोल जाऊन अपघात होतात. त्यात चालू दुचाकीवरून खाली पडल्याने जोरदार मार लागतो. अशात जर एखाद्या वस्तूवर डोकं आदळलं तर मेंदूला मार लागून व्यक्ती दगावतात. त्यामुळे सर्वत्र दुचाकीस्वारांना हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. (Helmet on train )
मेंदूला मार लागूनये यासाठी तुम्ही इतर ठिकाणी देखील हेल्मेट घालून कधी प्रवास केला आहेत का? सध्या सोशल मीडियावर ट्रेनमधील असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती ट्रेनमध्ये चक्क हेल्मेट घालून प्रवास करताना दिसत आहे. त्याचा हा प्रताप पाहून सगळेच थक्क झालेत. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार जोरदार चर्चा रंगली आहे.
का घातलं ट्रेनमध्ये हेल्मेट?
ट्रेनमध्ये हेल्मेट घालून फिरणाऱ्या या व्यक्तीने हे हेल्मेट का घतलं असावं असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल. तर या प्रश्नाचं उत्तर स्वत:त्या व्यक्तीनेच दिलं आहे. यात त्याने म्हटलं आहे की, कधी काय होईल सांगता येत नाही. आपल्या सेफ्टीची काळजी आपणचं घेतली पाहिजे. त्यामुळे मी आता सगळीकडे हेल्मेट घालून फिरत असल्याचं या व्यक्तीने म्हटलं आहे.
अपघाताचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. रेल्वेतून प्रवास करताना देखील मोठे अपघात होतात. यात अनेक व्यक्तींना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे अशा अपघातात देखील आपला जीव जाऊनये यासाठी या तरुणाने ट्रेनमध्ये हेल्मेट घातलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
एका यूजरने या व्यक्तीच्या कृत्याला वेडेपणा असल्याचं म्हटलं आहे. कारण आपण स्वत:ची काळजी घेणे हे तर गरजेचे आहे. मात्र अगदीच लोकल ट्रेन सारख्या गर्दीच्या ठिकाणी हेल्मेट घालून येणे हे थोडं विचित्र असल्याचं एका युजरने म्हटलं आहे. ट्रेनमधून अपघात होऊ नये यासाठी व्यवस्थीत ट्रेनमध्ये चढणे. तसेच धावती ट्रेन पकडू नये. ट्रेन चालू असताना दरवाजात उभे राहूनये अशा गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.