Weather Updates : राज्यात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

गुरूवारपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली
Rain News In Maharashtra Today
Rain News In Maharashtra TodaySaam tv

Rain In Maharastra : गणपती बाप्पाचं (Ganesh Chaturthi) आगमन होताच राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहे. आता राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस (Rain) कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (Rain News In Maharashtra Today)

Rain News In Maharashtra Today
Gold Price Today : सोने-चांदी दरात मोठी वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुरूवारपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या पुणे येथील विभागाचे प्रमुख के. एस. होसळीकर यांनी काही वेळापूर्वी ट्विट केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी येत्या दोन ते तीन दिवसांत मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती दिली. कोकण, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर, नाशिकसह पुणे विभागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. (Heavy Rain In Maharashtra News)

ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र, पावसाने पाठ फिरवली होती. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकरी चिंतेत होता. मात्र, गणरायाचं आगमन होताच, राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली.

दरम्यान, आता पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात येत्या गुरूवारपासून मुसळधार पाऊस होईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगणं गरजेचं आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com