Samruddhi Highway : अति घाई, संकटात नेई! समृद्धी महामार्गावरून सुसाट जाताय? मग ही बातमी वाचाच...

तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून प्रवास करीत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.
Samruddhi Mahamarg News :
Samruddhi Mahamarg News :Saam TV

Samruddhi Mahamarg News : तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून प्रवास करीत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना औरंगाबादच्या आरटीओ कार्यालयाने एक सल्ला दिला आहे. या सल्ल्याचं पालन केल्यास अपघाताला निमंत्रण मिळणार नाही. (Latest Marathi News)

Samruddhi Mahamarg News :
Samruddhi Mahamarg News: सावधान! समृद्धी महामार्गावरून अतिवेगाने गाडी चालवताय? मग हा VIDEO पाहाच...

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. नागपूर येथील एका भव्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते हा मार्ग सुरू करण्यात आला. मात्र, विकासाचा महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांचा सिलसिला सुरूच आहे.

गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) अपघातांच्या मोठ्या घटना घडत आहेत. वाहनाधारक अतिवेगाने गाडी चालवण्याच्या नादात वाहनावरील नियंत्रण गमावून बसतात. त्यामुळे मोठे अपघात होत आहे. तर टायर फुटण्याच्या मोठ्या घटना देखील घडत आहेत.

Samruddhi Mahamarg News :
Samruddhi Mahamarg Accident : महामार्ग की अपघातांचा रनवे! भरधाव वाहनासमोर अचानक तरस आलं अन्...

औरंगाबाद आरटीओने काय सल्ला दिला?

समृद्धी महामार्गावरून जुन्या फोर व्हीलर वेगात पळवू नका, असा सल्ला औरंगाबादच्या आरटीओने दिला आहे. औरंगाबाद आरटीओ अधिकाऱ्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी करून अपघात घडू नये यासाठी काय उपाययोजना करता येईल याबाबत काम सुरू केले आहे.

जुनी वाहने इतकी वेगाने चालविल्याने अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे. त्याबरोबर टायर गरम होऊन फुटण्याची भीती असते. अशावेळी टायरमध्ये नायट्रोजन गॅस भरणे फायद्याचे ठरू शकते, असे निरीक्षण आरटीओ अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे.

या महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक त्या सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत. वाहनचालकांच्या चुकीमुळे अपघातांना आमंत्रण मिळण्याचा धोका वाढतो. त्यामुळे महामार्गावर प्रवास करताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला अधिकाऱ्यांनीवाहनचालकांना दिला आहे. समृद्धी महामार्गावरील इंटर चेंजवर फलकाच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयाकडून खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com