Breaking: जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ 1500 किलो ड्रग्स जप्त; NCBची कारवाई

आज महाराष्ट्रमध्ये जळगाव मधून आज सोमवारी मुंबई एनसीबीने 1500 किलो अंमली पदार्थ जप्त केला आहे.
Breaking: जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ 1500 किलो ड्रग्स जप्त; NCBची कारवाई
Breaking: जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ 1500 किलो ड्रग्स जप्त; NCBची कारवाईसंतोष जोशी

संतोष जोशी

जळगाव : महाराष्ट्रामध्ये NCBची अंमली पदार्थ जप्त करण्याची मोहीम सुरूच आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांमध्ये ड्रग्जवर एनसीबीची कारवाई सुरूच आहे. आज गुजरात मधून 120 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. याचप्रकारे आज महाराष्ट्रमध्ये जळगाव मधून आज सोमवारी मुंबई एनसीबीने 1500 किलो अंमली पदार्थ जप्त केला आहे. हे अंमली पदार्थ ट्रकमध्ये भरून तस्करीसाठी अन्य राज्यांत व इतर जिल्ह्यांत नेण्यात येणार होता, मात्र नाकाबंदीदरम्यान खबर मिळाल्यानंतर एनसीबीने गांजा जप्त केला. यासोबतच एनसीबीने दोघांनाही अटक केली आहे.

वृत्तसंस्थेनुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईच्या पथकाला खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, जळगावमार्गे एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत आहे. यानंतर एनसीबीच्या पथकाने यापूर्वीच सापळा रचून तस्करांना पकडले आहे. नायगाव तालुक्यातील मांजर येथे कारवाई करण्यात आली आहे.

Breaking: जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ 1500 किलो ड्रग्स जप्त; NCBची कारवाई
गुजरातमध्ये 120 किलो ड्रग्ज जप्त: ‘उडता गुजरात’ म्हणत मलिकांचे ट्वीट

मुंबई एनसीबीने सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल नावाच्या परिसरातून गांजा जप्त करण्यात आला आहे. ट्रकमध्ये पोत्यांमध्ये भरून तो गांजा तस्करी करणार होता. महाराष्ट्रातून अंमली पदार्थाची ही खेप आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आणली जाणार होती, असे सांगण्यात येत आहे. हा ट्रक विशाखापट्टणम हून जळगाव कडे जात होता. आज पहाटे ही कारवाई करण्यात आली आहे. हे ड्रग्ज विशाखापट्टणातून आणण्यात आले असून, या कारवाईत २ जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. एनसीबी हे ड्रग्ज हे कुठे घेऊन जात होते याची माहिती घेत आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com