
मुंबई : काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते मुंबईतील दोन मेट्रो मार्गीकांचे उद्घाटन करण्यात आले होते. या दोन्ही मेट्रोंना (Mumbai Metro) मुंबईकरांनी (Mumbai) भरभरून प्रतिसाद दिला आहे. यामुळे आता या मेट्रोमार्गिकेचे कामांचे तास वाढवण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. यामुळे गुंदवली स्थानकातून अंधेरी पश्चिमेकडे व अंधेरी पश्चिमेकडून गुंदवली स्थानकासाठी शेवटची मेट्रो आता २२.३० सुटणार आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लाभ होणार आहे. (Maharashtra News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईतील गुंदवली ते अंधेरी पश्चिम यादरम्यानच्या मेट्रो दोन आणि मेट्रो सात या दोन्ही मार्गीकांचे उद्घाटन केले होते. यानंतर ही मेट्रो सेवा दुसऱ्या दिवसापासून मुंबईकरांच्या सेवेत सुरू झाली. दोनच दिवसात तब्बल एक लाखापेक्षा अधिक मुंबईकरांनी या मेट्रोतून प्रवास केला होता. दिवसेंदिवस या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली. त्यामुळे या मार्गावर अधिक सेवा सुरू कराव्यात अशी मागणी देखील प्रवाशांकडून करण्यात आली होती. यानंतर अधिक सेवा देण्याचा निर्णय एमएमआरडीए प्रशासनाने घेतला.
दोन महिन्यांसाठी निर्णय
आजपासून म्हणजेच १४ फेब्रुवारी २०२३ पासून मेट्रो लाईन्स २ ऐ आणि ७ वर कामकाजाचे तास वाढवले जाणार आहेत. रात्री २२.०९ वाजता सुटणाऱ्या शेवटच्या मेट्रो ऐवजी आता २२.३० वाजता मेट्रो सुटणार आहे. अतिरिक्त मेट्रो सेवा १४ फेब्रुवारीपासून प्रारंभी दोन महिन्यांसाठी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.