SAAM Sting Operation: आंबा कृत्रिमरित्या कसा पिकवतात? कोणतं केमिकल वापरतात बघा; स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक प्रकार उघड

आंबा कृत्रिमरित्या कसा पिकवतात? कोणतं केमिकल वापरतात बघा; स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक प्रकार उघड
Mango Mumbai News
Mango Mumbai NewsSaam tv

सिद्धार्थ म्‍हात्रे

मुंबई : सध्या आंब्याचा हंगाम सुरु असून रोज हजारो आंब्याच्या पेट्या बाजारात दाखल होत आहेत. परंतु नवी (Mumbai) मुंबईतील एपीएमसी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा (Mango) पिकवण्यासाठी इथेफॉन या रासायनिक द्रव्याचा वापर करण्यात येते असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. (Maharashtra News)

Mango Mumbai News
Bribe Trap: महिला तलाठीने घेतली वीस हजाराची लाच; एसीबीच्‍या सापळ्यात अटक

हजारो पेट्यांमध्ये आलेले आंबे लवकर पिकवण्यासाठी व्यापारी नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. कारण आंबे पिकवण्यासाठी व्यापारी थेट इथेफॉन या रासायनिक द्रव्याची फवारणी करत असल्याचे साम टीव्हीने केलेल्या स्टिंग ऑपेरेशनमध्ये समोर आले आहे.

एपीएमसीमध्ये (APMC) फिरल्यावर व्यापारी सर्रासपणे या स्प्रेच्या माध्यमातून इथेफॉन फवारणी करताना आढळतात. मात्र आपलं कृत्य कॅमेरात कैद होत असल्याचे लक्षात येताच अनेक जण स्प्रेची बॉटल लपवताना दिसतात.

व्हिडिओ बघा!

Mango Mumbai News
Shirdi News: महसुलमंत्र्यांच्या घरावर धडकणार लाल वादळ; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लॉंगमार्च

स्‍प्रेचा पारा थेट आंब्‍यावर

आंबा पिकवण्यासाठी इथेफॉन पावडरचा वापर केला जातो. मात्र तो ही ठराविक अंतरावरून आंब्याशी या पावडरचा संपर्क न येता करणे बंधनकारक आहे. मात्र व्यपारी थेट इथेफॉनच्या स्प्रे चा मारा आंब्यांवर करत आहेत. हे रासायनिक द्रव्य इतकं धोकादायक आहे की याची बॉटल देखील १ फूट खड्डा खोदुन त्यात पुरण्यात यावी; अशी सूचना बॉटलवरील निर्देशात दिले आहे. असे असताना एवढं धोकादायक रसायन थेट आंब्यावर मारून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. याप्रकरणी मनसे आक्रमक झाली असून इथेफॉनचा स्प्रे मारणाऱ्या व्यापाऱ्यांवर एफडीए ने कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com