Mumbai Crime News: गार्डने 3 दिवसांपूर्वी पीडितेच्या खोलीत शिरण्याचा प्रयत्न केला होता, मैत्रिणीची पोलिसांना माहिती

Mumbai Latest News Updates: घडलेला हा प्रकार पीडितेने आपल्याला सांगितला होता अशी माहिती तिच्या मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात दिली आहे.
File photo
File photoSAAM TV

>>सचिन गाड, साम टीव्ही

Mumbai Hostel Student Murder Case : सवित्रिदेवी फुले वसतिगृहातील विद्यार्थिनीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी ओमप्रकाश कनोजियाने हत्येच्या तीन दिवस आधी देखील मुलीच्या खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला होता असा खुलासा पीडीतेच्या मैत्रिणीने पोलीस चौकशीत केला आहे.

पीडितेच्या मैत्रिणीने सांगितले की घटनेच्या तीन दिवस आधी देखील आरोपीने मुलीच्या खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. सकाळी 5 वाजता जोरात दरवाजा वाजवून त्याने मुलीची झोप मोड केली होती. तसेच मुलीच्या खोलीत शिरण्याचा देखील त्याचा प्रयत्न होता. परंतु पीडित मुलीने त्याला खडसावलं होतं. घडलेला हा प्रकार तिने आपल्याला सांगितला होता अशी माहिती पीडीतेच्या मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात दिली आहे.

File photo
Madhya Pradesh News: 300 फूट खोल बोअरवेलमध्ये चिमुकलीचा अडकला श्वास, NDRF चा ४८ तासांपासून संघर्ष; नळ्यांमधून ऑक्सिजन, रोबोटही मागवले

पीडितेच्या 53 वर्षीय वडिलांनी देखील सांगितले की मुलीने त्यांना याबाबत कल्पना दिली होती. त्यानंतर त्यांनी तिला हॉस्टेल वॉर्डनला कळवण्याचा सल्ला दिला होता. मात्र आपल्याला कोणीही कळवले नसल्याचे वॉर्डनने पोलिसांना सांगितले आहे. विशेष म्हणजे होस्टेलमध्ये तीन सुरक्षा रक्षक होते आणि तिन्ही पुरुष होते. यावरून मुलीच्या वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक का नाहीत? असा सवाल पीडितेच्या वडिलांनी केला आहे. (Mumbai Hostel Student Murder Case)

तसेच वसतिगृह प्राधिकरणाच्या संबंधातील निष्काळजीपणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. पीडित मुलीने वॉर्डनला वसतिगृहातील बरीच जागा रिकामी असल्याने तिला खालच्या मजल्यावर हलवण्यास सांगितले होते. परंतु तिला एकतर तिच्या चौथ्या मजल्यावरील खोलीत राहण्यास किंवा वसतिगृह सोडण्यास सांगण्यात आले, असा दावा देखील पीडितेच्या वडिलांनी केला आहे. (Crime News)

File photo
Sambhajinagar: रात्री ११ नंतर छत्रपती संभाजीनगर शहर होणार बंद; नेमके कारण काय?

अकोला जिल्ह्यातून आलेली पीडित मुलगी वांद्रे येथील कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात होती आणि एप्रिल 2021 पासून वसतिगृहात राहात होती. तिला एक जुळा भाऊ आहे. आरोपी 35 वर्षीय कनोजिया मंगळवारी पहाटे 4.44 वाजता वसतिगृहातून बाहेर पडताना दिसला होता, त्यानतंर त्याने रेल्वे रुळांवर जाऊन आत्महत्या केली. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com