मुंडे समर्थकांचे राजीनामा सत्र सुरूच; तर राणे समर्थकांमध्ये जल्लोष
Pritam Munde, Pankaja Munde & Narayan RaneSaam Tv

मुंडे समर्थकांचे राजीनामा सत्र सुरूच; तर राणे समर्थकांमध्ये जल्लोष

''भाजपकडून (BJP) मुंडे भगिनींवर (Pankaja Munde & Pritam Munde) अन्याय केला जात असून जाणीवपूर्वक त्यांना त्रास दिला जात आहे. याचाच निषेध म्हणून आम्ही राजीनामे देत आहोत''

बीड: खासदार प्रीतम मुंडेंना (MP Pritam Munde) मंत्रीपदापासून डावलल्याने, बीडमध्ये भाजप पदाधिकारी असणारे पंकजा मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. भाजपकडून (BJP) मुंडे भगिनींवर अन्याय केला जात असून जाणीवपूर्वक त्यांना त्रास दिला जात आहे. याचाच निषेध म्हणून आम्ही राजीनामे देत आहोत, असं म्हणत गेल्या 2 दिवसांपासून आतापर्यंत तब्बल 47 जणांनी राजीनामे दिले आहेत.

यामध्ये माजी जि. प.अध्यक्षा तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सविता गोल्हार, भाजप जिल्हाध्यक्षांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या जयश्री मस्के यांच्यासह 4 जिल्हा परिषद सदस्य, 3 पंचायत समिती सदस्य, 6 नगरसेवक या 13 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांच्यासह अकरा तालुकाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष यांच्यासह विविध जिल्हा बॉडीवरील पदाधिकारी व आघाड्यांचे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

आतापर्यंत या 47 जणांनी राजीनामे दिले असून आणखीनही आज पदाधिकारी राजीनामे देण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नाराज पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्षात समजून कोण काढणार ? हे नाराज पदाधिकारी ऐकणार का ? पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेणार ? याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळातून लक्ष लागले आहे. दरम्यान, एकीकडे भाजप पदाधिकारी राजीनामा देत असताना राणे समर्थकांत जल्लोष पाहायला मिळत आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com