नांदेड जिल्ह्यात आयुर्वेदिकच्या नावाखाली मुन्नाभाई डॉक्टरांचा सुळसुळाट

याशिवाय विविध प्रलोभने दाखवून श्रद्धेचे बाजारीकरण केले जात आहे. या प्रलोभनाला बळी न पडता प्रत्येक गोष्ट डोळसपणे पाहिल्यास अनेक समस्यांचा निपटारा होण्यास मदत मिळते.
नांदेड जिल्ह्यात आयुर्वेदिकच्या नावाखाली मुन्नाभाई डॉक्टरांचा सुळसुळाट
नांदेड जिल्ह्यात बोगस डाॅक्टरांचा सुळसुळाट

नांदेड : हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील तामसा परिसरात मुन्नाभाई एमबीबीएस या बोगस डॉक्टरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून आयुर्वेदिक औषधी देणे व गंडादोऱ्यांच्या नावाखाली ग्रामीण भागातील भोळ्याभाबड्या जनतेची पिळवणूक चालवल्याचे चित्र आहे. या गंभीर बाबीकडे तालुका आरोग्य अधिकारी वेळीच लक्ष देतील का? अशी चर्चा जनतेतून होत आहे.

तामसा परिसरातील बहुतांश भाग हा वाडी, तांडे यांनी व्यापलेला आहे. आदिवासीबहुल भाग असल्याने या परिसरात अंधश्रद्धेचे प्रमाण मोठे आहे. याचाच अचूक फायदा या वीनापदवीधारक बोगस डॉक्टरकडून उचलला जात आहे. परराज्यातील डॉक्टर व आयुर्वेदिक औषधीच्या नावाखाली बनलेले मुन्नाभाई एमबीबीएस आपले बस्तान ऐन रस्त्याच्या कडेला थाटलेले पाहावयास मिळत आहेत. ज्यात मुतखडा, मुळव्याध, कॅन्सर, कोरोना, दारु सोडवा, लकवा, जादुटोना, साप चावणे या व्याधीचे औषधी याठिकाणी चढ्या दराने दिली जातात. असे दूरवरुन आलेल्या व्याधीग्रस्त रुग्णाचे म्हणणे आहे.

हेही वाचा - हिंगोली जिल्ह्यातील महावितरण विभागाचे काम अत्यंत ढिसाळ असून याबाबत त्यांना वारंवार सूचना करूनही कामात सुधारणा केली जात नाही

याशिवाय विविध प्रलोभने दाखवून श्रद्धेचे बाजारीकरण केले जात आहे. या प्रलोभनाला बळी न पडता प्रत्येक गोष्ट डोळसपणे पाहिल्यास अनेक समस्यांचा निपटारा होण्यास मदत मिळते. मंत्राने विंचू सापाचे विष उतरत नाही, तर अंगावर मोबाईल फिरवल्यास उतरेल का? यासाठी रुग्णाला नजीकचे रुग्णालय गाठणे गरजेचे आहे. यामुळे होणारी आर्थिक हानी टाळण्यास मदत मिळते. असे असूनही ग्रामीण जनता या भोंदू बाबाच्या भूलथापांना बळी पडलेली दिसून येते. यामुळेच भोंदूबाबाने आयुर्वेदिक या गोंडस नावाखाली चालवलेल्या व्यवसायाला मोठी गर्दी होताना दिसून येते.

फोफावत चाललेल्या या "जादुटोना" या अघोरी कृत्यामुळे रुग्णाला एखादेवेळेस जीव गमवावा लागण्याची शक्यता आहे. याशिवाय ग्रामीण भागात खेडोपाडी येणारे परप्रांतीय बोगस डॉक्टर विनापरवाना एखाद्या रुग्णालयात सेवक राहून तेथे आलेल्या रुग्णास इंजेक्शन देणे, सलाईन लावणे अशी कौशल्ये अवगत करुन ग्रामीण भागातील वाडी, तांड्यात, जाऊन भोळ्याभाबड्या जनतेची आर्थिक पिळवणूक करुन आपली चांदी करुन घेत असल्याचे पहावयास मिळते. एवढे असूनही आरोग्य विभागाला याचा थांगपत्ता नसावा ही बाब अजब म्हणावे लागेल. परप्रांतीय विना परवानाधारक डॉक्टर व आयुर्वेदिकच्या नावाखाली मुन्नाभाई एमबीबीएस झालेले डॉक्टर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र मेडिकल कायदा कलम 33 आणि 36 अन्वये गुन्हा नोंदविण्याचा प्रावधान आहे. तालुका आरोग्य अधिकारी या परप्रांतीय व आयुर्वेदिकच्या नावाखाली बनलेले मुन्नाभाई एमबीबीएस यांचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करतील का? याकडे या भागातील जनतेचे लक्ष लागले आहे. असे झाल्यास या भागातील भोळ्याभाबड्या जनतेची होणारी आर्थिक लूट थांबण्यास मदत मिळणार आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com