धक्कादायक : जादूटोण्याच्या संशयातून कपडे धुवायला गेलेल्या विधवा महिलेची केली हत्या
Bhandara CrimeSaam TV

धक्कादायक : जादूटोण्याच्या संशयातून कपडे धुवायला गेलेल्या विधवा महिलेची केली हत्या

आरोपीने सांगितलं मृत बबिता तिरपुडे हिने जादूटोणा केल्यामुळेच त्याची पत्नी मायाबाईचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.

भंडारा : जादूटोण्याच्या संशयातूनच विधवा महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यात (Bhandara) घडली आहे. मनात संशयाने घर केले कि किती मोठा अनर्थ घड़तो याची प्रचिती भंडाऱ्यात आहे. जादूटोना करत आपल्या पत्नीला मारल्याचे कारण समोर करत एका आरोपीने मित्राच्या मदतीने ४५ वर्षीय महिलेची डोक्यात काठिने वार करत गळा दाबुन हत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलीस स्टेशन (Kardha Police Station) अंतर्गत नवेगांव येथे उघड़ झाली आहे.

राजहंस कुंभरे, विनोद रामटेके दोन्ही रा. नवेगाव (कोका) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. कोका वन्यजीव अभयारण्यालगत असलेल्या संरक्षित वनातील नवेगाव येथील कपड़े धुवायला गेलेल्या बबिता तिरपुडे हिचा २८ एप्रिल रोजी रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला होता. बबिता हिच्या डोक्यावर काठी मारून व गळा दाबून तिचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले होते.

Bhandara Crime
लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाचे अनैतिक संबंध नवरीला समजले, त्यानंतर....

याप्रकरणी कारधा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेत विचारपूस केली असता आरोपी राजहंस कुंभरे याने मृत बबिता तिरपुडे हिने जादूटोणा केल्यामुळेच त्याची पत्नी मायाबाई हिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. या संशयाचा राग मनात धरून बदला घेण्यासाठी बबिता तिरपुडे हिचा खून विनोद रामटेके याच्या मदतीने केल्याची कबुली त्याने दिली आहे. दोन्ही आरोपींना कारधा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास कारधा पोलिस करीत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.