धुळे तालुक्यातील जापी परिसरात तरुणाचा खून

याबाबतची माहिती तालुका पोलिसांना समजताच तालुका पोलिसांची संपूर्ण टीम घटनास्थळी दाखल झाली.
धुळे तालुक्यातील जापी परिसरात तरुणाचा खून
धुळे तालुक्यातील जापी परिसरात तरुणाचा खूनSaam Tv

भूषण अहिरे

धुळे - तालुक्यातील जापी शेत शिवारातील शेतात खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजेंद्र रामसिंग बारेला पावरा तरुणाचा धारदार शस्त्राने गळ्यावर त्याचबरोबर शरीराच्या इतर ठिकाणी सपासप वार करून निर्घुणपणे या युवकाची हत्या करण्यात आली आहे. याबाबतची माहिती तालुका पोलिसांना समजताच तालुका पोलिसांची संपूर्ण टीम घटनास्थळी दाखल झाली.

हे देखील पहा -

शेतामध्ये तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अवस्थेमध्ये पोलिसांना आढळून आला. यासंदर्भात प्राथमिक माहितीवरून तालुका पोलिसांनी संशयितांना देखील ताब्यात घेतले आहे. या खुनाचा उलगडा लवकरच लागण्याची शक्यता तालुका पोलिसांनी व्यक्त केली आहे. फॉरेन्सिक एक्सपर्टच्या मदतीने तालुका पोलिसांतर्फे पुढील तपास सुरु करण्यात आला असून संपूर्ण परिसरामध्ये या हत्येची बातमी पसरताच एकच खळबळ उडाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com