अज्ञात व्यक्तीचा दगडाने ठेचून खून; आरोपीला उदगीर पोलिसांकडून १२ तासाच्या आत बेड्या

मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास लातुर जिल्ह्यातील उदगीर बस स्टॅंड परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये अज्ञात व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता.
अज्ञात व्यक्तीचा दगडाने ठेचून खून; आरोपीला उदगीर पोलिसांकडून १२ तासाच्या आत बेड्या
MurderSaam Tv

लातूर : मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास लातुर जिल्ह्यातील उदगीर बस स्टॅंड परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये अज्ञात व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. यातील आरोपीच्या उदगीर शहर पोलिसांनी 12 तासाच्या मुसक्या आवळल्या आहेत. कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील लोदा गावचे रहिवाशी असलेले बाबुराव पांचाळ यांचा संध्याकाळी 08 वाजण्याच्या सुमारास उदगीर बस स्टँड परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून दगडाने डोक्यावर मारून गंभीर जखमी करून खून केला होता.

हे देखील पहा :

उदगीर शहर पोलिसांना मिळाली पोलीस निरीक्षक गोरख दिवे व त्यांच्या टीमने घटना स्थळास भेट दिली व परिसरातील व्यक्तींकडे मयत व्यक्तीबाबत चौकशी करून माहिती मिळवून मयत व्यक्तीची ओळख पटविली. सदर मयत व्यक्ती बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील लोदा गावचे असून बाबुराव पांचाळ हे नाव असल्याचे समजले. त्यावरून उदगीर बस डेपो मॅनेजर कानतोडे यांचे फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरुद्ध पोलीस स्टेशन उदगीर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

Murder
विरार मध्ये तरुणावर चॉपर ने हल्ला, घटना CCTV मध्ये कैद; पहा Video

सदर गुन्ह्यातील आरोपी चा शोध घेण्याबाबत उदगीर शहर पोलिसांनी रात्रभर तपासाची चक्रे फिरवून घटनेबाबत विविध लोकांकडे कचरा वेचणारे इसम, रिक्षेवाले, हातगाडीवाले यांच्याकडे चौकशी करून तसेच मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून गुन्ह्यातील संशयित आरोपी 43 वर्षीय देवणी येथील रहिवासी असलेला ईरवंत नागनाथ मानकरी याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदरच्या व्यक्तीचा खून केल्याची कबुली दिल्याने त्यास उदगीर शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com