हेडफोनच्या वादातून युवतीची हत्या !

अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गौरक्षण रोड परिसरात हेडफोनच्या वादातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
हेडफोनच्या वादातून युवतीची हत्या !
हेडफोनच्या वादातून युवतीची हत्या !जयेश गावंडे

अकोला - अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गौरक्षण रोड परिसरात हेडफोनच्या वादातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माधवनगर येथील रहिवासी असलेल्या एका 20 वर्षीय आतेबहिणीची तिच्याच मामेभावाने हेडफोन न दिल्याच्या कारणावरून पोटात धारदार चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. Murder of girl due to headphones!

हे देखील पहा -

या हत्याकांडातील आरोपीस खदान पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या हत्येचे नेमके कारण काय आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. माधवनगर येथील रहिवासी नेहा नंदलाल यादव व तिचाच मामेभाऊ ऋषिकेश उर्फ बॉबी राममोहन यादव हे शेजारी शेजारी राहतात. आज सायंकाळी हे दोघेही घरी असताना त्यांच्यात मोबाइलच्या हेडफोनवरून वाद सुरू झाला.

हेडफोनच्या वादातून युवतीची हत्या !
सावधान! कागदपत्रे सोबत नसतील तर तुमची गाडी होईल जप्त

या वादात ऋषिकेश उर्फ बॉबीने संतापात येत आतेबहीण नेहाच्या पोटात धारदार चाकूने वार केले. यामध्ये गंभीररीत्या जखमी नेहाचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान उत्तरीय तपासणीसाठी नेहाला अकोल्यातील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त केले आहे. या घनतेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. नेमकी घटना का घडली याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com