लाडसावंगीत धार्मिक एकतेचे दर्शन; मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीवर केली पुष्पवृष्टी

हिंदू आणि मुस्लिमामध्ये असलेली एकात्मता आणि एकमेकांबद्दलची आस्था औरंगाबाद जिल्ह्यात एका घटनेने पुन्हा समोर आली आहे.
लाडसावंगीत धार्मिक एकतेचे दर्शन; मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीवर केली पुष्पवृष्टी
Aurangabad NewsSaam Tv

औरंगाबाद - सध्या राज्यात मशिदीवरचे भोंगे आणि हनुमान चालीसा यावर जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, त्याचा परिणाम राज्यातील ग्रामीण भागात दिसत नाही. उलट गावागावात धार्मिक एकोप्याचे दर्शन होताना दिसत आहे. हिंदू आणि मुस्लिमामध्ये असलेली एकात्मता आणि एकमेकांबद्दलची आस्था औरंगाबाद जिल्ह्यात एका घटनेने पुन्हा समोर आली आहे. औरंगाबाद (Aurangabad) तालुक्यातील लाडसावंगी येथे गावातील हनुमान मंदिराच्या कळशारोहण करण्यासाठी निघालेल्या मिरवणुकीवर गावातील मुस्लीम समाजबांधवांनी पुष्पवृष्टी करून एकतेचा संदेश दिला.

हे देखील पाहा -

राज्यात मशिदींमध्ये होणाऱ्या अजानविरोधात मशिदींसमोर हनुमान चालीसा लावा, असा आदेश राज ठाकरे यांनी दिला आहे. यामुळे राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र ग्रामीण भागातील वातावरणावर याचा कुठलाही परिणाम झालेला दिसत नाही. लाडसावंगी गावात हनुमान मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला. नव्याने बांधलेल्या मंदिरात ५ ते ७ मे दरम्यान धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Aurangabad News
अंबरनाथमध्ये पहाटेची अजान होणार बंद; सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना

यात गुरुवारी गावामध्ये रथामधून कलश मिरवणूक काढण्यात आली. सकाळी नऊच्या सुमारास मिरवणूक गावातील मुस्लीम बागवान गल्लीत आली असता, मिरवणुकीवर मुस्लिम बांधवांनी पुष्पवृष्टी करून मिरवणुकीचे स्वागत केले. मिरवणूक सुरू असताना मुस्लीम गल्लीत अचानक झालेल्या पुष्पवृष्टीने भाविकही आनंदित झाले. हनुमान मंदिरात आज कलश स्थापना होणार आहे, त्यातही मुस्लिम बांधव सहभागी होणार आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.