नाशिकमध्ये सापडला रहस्यमय भुयारी मार्ग! पहा Video

या पेशवेकालीन भुयारात इतरही 3 ते 4 मार्ग असण्याची शक्यता असून पेशव्यांच्या काळात शत्रूपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी हे चोरटे भुयार तयार करण्यात आल्याचाही अंदाज व्यक्त केला जातोय.
नाशिकमध्ये सापडला रहस्यमय भुयारी मार्ग! पहा Video
नाशिकमध्ये सापडला रहस्यमय भुयारी मार्ग! पहा Video अभिजित सोनावणे

नाशिक : नाशिकच्या आनंदवली परिसरात इमारतीचं खोदकाम सुरू असतांना कुतूहल निर्माण करणारा चोरटा भुयारी मार्ग सापडलाय. आनंदीबाई पेशवे यांच्या गढीच्या जागेत हा भुयारी मार्ग सापडल्याने या भुयारी मार्गाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालंय. ज्या जागेत हे भुयार सापडलं आहे, ही जागा आनंदी बाई पेशवे यांच्या गढीची आहे. मात्र, सध्या ही जागा शहरातील राजकीय क्षेत्रातील काही बड्या लोकांसह बांधकाम व्यवसायिकांच्या मालकीची असून साठे नावाच्या खाजगी विकासकाने या जागेवर हवेली नावाचा गृहप्रकल्प उभारणीला सुरवात केलीय.

मात्र, या प्रकल्पाचा पाया खोदत असतानाच या ठिकाणी ऐतिहासिक भुयार सापडल्याने हा प्रकल्प आता अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालीय. खोदकाम सुरू असताना सापडलेल्या या पेशवेकालीन भुयारात इतरही 3 ते 4 मार्ग असण्याची शक्यता असून पेशव्यांच्या काळात शत्रूपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी हे चोरटे भुयार तयार करण्यात आल्याचाही अंदाज व्यक्त केला जातोय.

नाशिकमध्ये सापडला रहस्यमय भुयारी मार्ग! पहा Video
Elections: नवी मुंबईतील मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार; नाव एकाचे छायाचित्र दुसऱ्याचे!
नाशिकमध्ये सापडला रहस्यमय भुयारी मार्ग! पहा Video
बाब्बो जीवंत व्यक्तीला दाखवलं कोरोना मयत; आरोग्य विभागाचा प्रताप!

ज्या जागेत हे ऐतिहासिक भुयार सापडलंय. त्या आनंदीबाईंच्या गढीच्या जागेवर आजही नदीच्या आणि मंदिराच्या बाजूने दगडी पायऱ्या, दरवाजे, नदीच्या काठावर असणारे तट भुयारी मार्ग अशा जतन करण्यासारख्या अनेक ऐतिहासिक बाबी अस्तित्वात आहेत. मात्र, इतका महत्वाचा ऐतिहासिक ठेवा अस्तित्वात असतानाही ही जागा खासगी विकासकांच्या ताब्यात कशी गेली? असा प्रश्न उपस्थित होत असून या ऐतिहासिक ठेव्याचं जतन करण्याची गरज आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com