नाबार्डचा पुरस्कार आमच्यासाठी सार्थ अभिमान : शिवेंद्रसिंहराजे

नाबार्डचा पुरस्कार आमच्यासाठी सार्थ अभिमान : शिवेंद्रसिंहराजे
satara district cooperative bank

सातारा : सातारा जिल्हा बँकेने सर्वंकष आर्थिक प्रगती आणि सामाजिक बांधिलकी जपत दिलेल्या योगदानामुळेच बँकेस नाबार्डने उत्कृष्ट कार्यक्षमतेसाठीचा राष्ट्रीय पातळीवरील बेस्ट परफॉर्मन्स बँक म्हणून Special Commemorative Award (विशेष स्मृतिचिन्ह पुरस्कार) देवून गौरविले आहे याचा आम्हां सर्वांना सार्थ अभिमान आहे अशा भावना बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले shivendraraje bhosale यांनी व्यक्त केल्या. नाबार्डने National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) ४० व्या वर्धापनदिनी आज (साेमवार) सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस विशेष पुरस्कार जाहीर केल्यानंतर बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकार परिषदेत भावना व्यक्त केल्या. (nabard-decleares-award-satara-district-cooperative-bank-trending-news)

प्रारंभी या पुरस्काराचे वितरण ऑनलाईन पद्धतीने केंद्रिय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर narendra singh tomar यांच्या हस्ते झाले. त्यावेळी हा पुरस्कार अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनिल माने, सर्व संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे व बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांनी स्विकारला.

या पुरस्काराची घाेषणा झाल्यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे satara district cooperative bank अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले देशातील राज्य सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची नियंत्रक म्हणून राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) कामकाज करते. या बँकांच्या नियमित बँकिंग कामकाजावर देखरेख ठेवून बँकांच्या प्रगतीचा आढावा घेते.

देशातील कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास करणेसाठी केंद्र सरकारने नाबार्डची १२ जुलै १९८२ रोजी स्थापना केलेली आहे. नाबार्डच्या स्थापनेस ४ दशकांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. नाबार्डच्या ४ दशकांच्या वाटचालीत देशातील राज्य व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी भागीदार या नात्याने मौलीक कामगिरी केलेली आहे. जिल्हा बँकांच्या देशाच्या कृषि व ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासामधील महत्वपूर्ण योगदानासाठी नाबार्डने त्यांच्या ४० व्या स्थापना दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणा-या जिल्हा बँकांना पुरस्काराने सन्मानित करण्याचे निश्चित केले होते.

याकरिता प्रामुख्याने शेतीसाठी कर्ज पुरवठयामधील सहभाग, वंचित घटकांना बँकिंग प्रवाहात समाविष्ट करणे, महिला सक्षमीकरण कामकाज, तंत्रज्ञानाचा अवलंब, बँकांची आर्थिक प्रगती, कर्जवितरण व कर्ज वसुलीमधील सातत्य, उत्कृष्ट नफा क्षमता आदी निकष निश्चित केले होते.

या निकषांच्या आधारावर सातारा जिल्हा बँकेने सातत्याने बँकिंग व नॉन बँकिंग क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे बँकेस उत्कृष्ट कार्यक्षमतेबद्दल बेस्ट परफॉर्मन्स बँक म्हणून Special Commemorative Award (विशेष स्मृतिचिन्ह पुरस्कार) जाहीर केला आहे. त्याचा आम्ही आज स्विकार केला.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले म्हणाले सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हयाच्या कृषि व ग्रामीण विकासासाठी अविरत कार्यरत आहे. बँकेने शेतकरी सभासदांना ३ लाखापर्यंतचे पीक कर्ज ‘शून्य’ टक्के व्याजदराने, ३० लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज ‘शून्य’ टक्के व्याजदराने उपलब्ध करुन दिले आहे. विकास संस्था सक्षमीकरणासाठी बँक पातळीवर १०० टक्के कर्ज वसुली करणा-या संस्थांना गत ११ वर्षापासून दरवर्षी सव्वीस हजार २९ हजार रुपये प्रमाणे आजपर्यंत प्रती विकास सेवा सोसायटीस २.८३ लाख वसुली प्रोत्साहन निधी दिलेला आहे. संस्था पातळीवर १०० टक्के कर्ज वसुली करणा-या संस्थांना १५ हजार पर्यंत गौरव निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे संस्था सक्षम होण्यास मोलाची मदत झालेली आहे.

जिल्हयातील शेतक-यांची बँकेवर असलेली अढळ निष्ठा, आर्थिक शिस्त, विकास संस्था, संचालक मंडळ व सचिव बांधव आणि जिल्हयातील साखर कारखान्यांच्या सहकार्यामुळे यावर्षी कोरोनाच्या संकट काळातही बँकेची ९७ टक्के एवढी देशात सर्वोच्च कर्ज वसुली झालेली आहे. त्याच बरोबर ९५४ संस्थांपैकी ८५७ संस्थांची बँक पातळीवर १०० टक्के कर्ज वसुली झालेली आहे. मार्च २०२१ अखेर ९५४ विकास सेवा संस्थांपैकी ८५० संस्था नफ्यात असून बँकेने ७ दशकाच्या वाटसालीमध्ये वसुली व नफ्यामध्ये सातत्य ठेवून विक्रम प्रस्थापित केलेला आहे.


सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ग्रामीण भागातील तळागाळातील सर्वसामान्य शेतकरी सभासदांपर्यंत पोहोचली असून जिल्हयामध्ये ३२० शाखा, ९५४ विकास सेवा संस्था, ५३ एटीएम व मोबाईल व्हॅन च्या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक विविध प्रकारच्या बँकिंग सुविधा देत आहे . सातारा जिल्हा मध्य .सह .बँक भारतीय राष्ट्रीय पेमेंट निगम (एनपीसीआय) च्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) प्रणालीवर लिंक झालेमुळे ग्राहकांना भीम, गुगलपे, फोनपे, पेटीएम, फ्री चार्ज, जिओ मनी द्वारे खरेदी व्यवहार करणे, फोन बिल भरणे, लाईट बिल भरणे, मोबाईल रिचार्ज करणे, ई-कॉमर्स, रक्कम वर्ग करणे इत्यादि सेवा उपलब्ध झालेल्या आहेत . बँक फक्त पीक कर्ज वाटप न करता मध्यम व दीर्घ मुदत कर्ज योजनांचे माध्यमातून कर्ज वाटपात अग्रेसर राहिली आहे . बँक विकास संस्था सक्षमीकरणासाठी प्रत्येक वर्षी नफ्यातून तरतूद करते त्यामुळे विकास संस्थांना नफ्यात येणेस मदत होत आहे.

satara district cooperative bank
बॅंकांना धडाधड नाेटीसा; पुणे जिल्हा बॅंकेने ईडीला दिले उत्तर

शेतक-यांना व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजारात वैद्यकिय उपचारासाठी मोठा खर्च करावा लागतो. शेतक-यांची आर्थिक अडचण विचारांत घेवून बँकेने शेतकरी ग्रुप मेडिक्लेम इन्शुरन्स पॉलिसि राबविणेचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी बँक आपले उत्पन्नातून १२ कोटी पर्यंत विमा हप्ता भरणार आहे. बँकांच्या ठेवीदारांसाठी अद्याप कुठल्याही बँकेने स्वखर्चातून विमा योजना कार्यान्वित केलेली नाही. सातारा जिल्हा बँकेच्या १० लाख बचत ठेव खातेदारांसाठी एक कोटी खर्च करुन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे सुरक्षा कवच उपलब्ध करुन देणार आहे.

कोरोनाच्या संकटकाळात बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी १६ लाख, जिल्हयातील मजूरांसाठी एक कोटीचे जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरण केले आहे. जिल्हयाच्या ग्रामीण भागात गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर शासकीय रुग्णांलयामध्ये उपचार करणेसाठी तीन कोटी खर्च करुन व्हेंटीलेटर, बायपॅप मशीन व ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन्स उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com