भाविकांनाे! शिर्डीच्या साईबाबांना निघालात? आनंदाची बातमी वाचाच

शिर्डी येथे येणा-या भाविकांची मागणी जिल्हा प्रशासनाने केली मान्य.
भाविकांनाे! शिर्डीच्या साईबाबांना निघालात? आनंदाची बातमी वाचाच
sai baba

शिर्डी : शिर्डी येथे जाणा-या साई भक्तांना आजपासून (शुक्रवार) साईंचे प्रसादलाय सुरू झाले आहे. सात ऑक्टोबरला साई समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर साई बाबांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची वर्दळ वाढली. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रसादलाय बंद ठेवले होते.

sai baba
मराठा आरक्षणाचा खेळ झाला; राज्यकर्त्यांवर शिवेंद्रराजे नाराज

प्रसादलाय बंद राहिल्याने शिर्डीत येणा-या अंसख्य भाविकांची जेवणाची गैरसोय होत हाेती. त्यामुळे प्रसादलाय सुरू करावे अशी मागणी भाविकांसह स्थानिक ग्रामस्थ करीत हाेते. त्यानूसार जिल्हा प्रशासनाने प्रसादलाय सुरू करण्याची परवानगी साई संस्थानला दिली.

आजपासून प्रसादलाय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी सुमारे ५ हजार भाविक भाेजन प्रसाद घेऊ शकतात. दरम्यान भाविकांनी काेविड मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक असल्याची माहिती साई संस्थानने दिली.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com