
- सुशील थोरात
Nagar News : शेवगाव शहरातील वादग्रस्त घटनेनंतर आज सलग पाचव्या दिवशी (गुरुवार, ता. 18 मे) ग्रामस्थांनी गाव कडकडीत बंद (shevgaon Bandh) ठेवले आहे. दरम्यान आज शेवगाव ग्रामस्थ आणि व्यापारी हे तहसील कार्यालयावर मूक माेर्चा (muk morcha) काढणार आहेत. (Maharashtra News)
नगर (nagar) जिल्ह्यातील शेवगावात छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीत दोन गटात वाद झाला. त्यानंतर शहरातील दुकानांची आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. या घटनेनंतर पोलिसांनी 200 पेक्षा जास्त संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत पोलिसांनी 44 जणांना अटक केली आहे.
या घटनेतील संशयितांचा पाेलिस शाेध घेताहेत. त्यासाठी पाेलिसांची सहा पथके नेण्यात आली आहेत. दरम्यान सर्व संशयितांना अटक होईपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याच्या निर्णयावर व्यापारी आजही ठाम राहिली आहेत. आज पाचव्या दिवशी शेवगावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
दरम्यान आज नागरिक आणि व्यापारी तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढणार आहेत. त्यासाठी एकेक जण माेर्चा निघणार असल्याचे ठिकाणी जमू लागले आहेत.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.