Nagar Panchayat Election 2022 Result: सेना की राष्ट्रवादी? साता-यात उत्सुकता

सकाळी दहा वाजल्यापासून एकेक निकाल हाती येण्यास प्रारंभ हाेईल.
Nagar Panchayat Election 2022 Result: सेना की राष्ट्रवादी? साता-यात उत्सुकता
who will win shivsena or ncp Nagar Panchayat Election 2022 Resultsaam tv

सातारा : सातारा जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींसाठी २४ जागांसाठी ३३ केंद्रांवर मतदान झाले. त्यामध्ये खंडाळा, लोणंद, दहिवडी, वडूज, पाटण, कोरेगाव या नगरपंचायतींचा समावेश आहे. या सर्व लढतींमध्ये पाटण येथील लढत चुरशीची आणि महत्वपूर्ण मानली जात आहे. शिवसेनेचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचा पाटणकर गट अशी ही पारंपारिक लढत होत आहे. या भागात आमदार जरी शिवसेनेचा असला तरी राष्ट्रवादीचा गट मात्र मोठा आहे. ((Nagar Panchayat Election 2022 Result Live Update)

कोरेगाव नगर पंचायतीत (nagar panchayat election) सुद्धा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. यामध्ये सध्याचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांच्यात ही लढत आहे. सध्या तरी शिवसेना आमदार महेश शिंदे यांचे पारडे जड वाटत आहे. (Nagar Panchayat Election 2022 Result)

दहिवडी येथील नगरपंचायतीची निवडणूक सुद्धा प्रतिष्ठेची मानली जात आहे. यामध्ये भाजप आमदार जयकुमार गोरे (jaykumar gore), शिवसेना नेते शेखर गोरे आणि राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या जबरदस्त चुरस पाहायला मिळत आहे. या सर्व ठिकाणचे निकाल अंदाजे दहानंतर हाती यायला सुरुवात होईल.

who will win shivsena or ncp Nagar Panchayat Election 2022 Result
Satara: उदयनराजेंचे मनोरंजन पहा व साेडून द्या; सातारकरांना शिवेंद्रराजेंचे आवाहन

सातारा (satara) जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींसाठी २४ जागांसाठी झालेले एकूण मतदान.

खंडाळा-84.89%

लोणंद-79.25%

दहिवडी-85.03%

वडूज-80.86%

पाटण-76.48%

कोरेगाव-79.79%

एकूण-80.49%

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.