राज्यातल्या ३२ जिल्ह्यातील नगर पंचायतीचा  निवडणूक कार्यक्रम जाहीर...
राज्यातल्या ३२ जिल्ह्यातील नगर पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर...Saam Tv

राज्यातल्या ३२ जिल्ह्यातील नगर पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर...

निवडणूक आयोगाच्या या जाहीर कार्यक्रमानुसार राज्यातील ३२ जिल्ह्यातील १०५ नगर पंचायतीसाठी २१ डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे.

जालना - राज्यातील एप्रिल २०२० ते मे २०२१ पर्यंत ८१ नगरपंचायत तर डिसेंबर २०२१ पर्यंत १८ नगरपंचायत मुदत संपल्या होत्या, त्याचं बरोबर राज्यात नव्याने नवनिर्मित ६, अशा एकूण १०५ नगर पंचायतीच्या सदस्य पदांसाठी सार्वत्रिक प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या या जाहीर कार्यक्रमानुसार राज्यातील ३२ जिल्ह्यातील १०५ नगर पंचायतीसाठी २१ डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे.

हे देखील पहा -

तर २२ डिसेंबरला मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारांना १ डिसेंबर ते ७ डिसेंबर पर्यंत आपले नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. तर ८ डिसेंबरला नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे तर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची तारीख १३ डिसेंबर असणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुदत संपलेल्या नगर पंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com