Nagar Panchayat Election Results: मराठवाड्यात भाजप नंबर 1 तर शिवसेना चौथ्या स्थानावर

नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला धोबीपछाड देत भाजपाने बीड जिल्ह्यात तब्बल 47 जागा मिळवल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 21 जागा मिळाल्या. सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी ताकत लावूनही जागा वाढण्याऐवजी कमी झाल्या.
Nagar Panchayat Election Results: मराठवाड्यात भाजप नंबर 1 तर शिवसेना चौथ्या स्थानावर
Nagar Panchayat Election Results: मराठवाड्यात भाजप नंबर 1 तर शिवसेना चौथ्या स्थानावरSaam TV

औरंगाबाद : मराठवाड्यातील 23 नगरपंचायती निवडणुकीच्या निकालात BJP सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर राज्यात सत्तेतला प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेला चौथं स्थान मिळालं आहे. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे स्थान आजच्या निकालांमध्ये राहिले आहे.

मराठवाड्यातील एकूण 391 जागांपैकी 102 जागा भाजपाने जिंकल्या आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने 94, काँग्रेसने 80 तर शिवसेनेने (Shivsena) 74 जागा जिंकल्या आहेत. ग्रामीण मराठवाड्यात प्रहार जनशक्ती संघटनेने 6, राष्ट्रीय समाज पक्षाने 5, एमआयएमने 5 तर वंचितने 2 जागा मिळवल्या आहेत. उर्वरित 23 जागांवर अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांनी यश मिळवलंय.

Nagar Panchayat Election Results: मराठवाड्यात भाजप नंबर 1 तर शिवसेना चौथ्या स्थानावर
Elections : "जेवढ्या निवडणुका होतायत, तिथे राष्ट्रवादीची भरभराट आणि शिवसेनेची फरफट होतेय"

नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला धोबीपछाड देत भाजपाने बीड जिल्ह्यात तब्बल 47 जागा मिळवल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 21 जागा मिळाल्या. सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी ताकत लावूनही जागा वाढण्याऐवजी कमी झाल्या.

शिवसेनेला औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यात यश मिळाले. जालना जिल्ह्यात शिवसेनेने सर्वाधिक 22 जागा जिंकल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायत भाजपकडून (BJP) शिवसेनेच्या ताब्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसने जालना जिल्ह्यात सर्वाधिक ३४ जागा जिंकल्या. लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या जागा वाढवण्यात राष्ट्रवादीला यश मिळालं. परभणीच्या पालम नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने एक हाती यश मिळवले.

हे देखील पहा -

नांदेड जिल्ह्यात काँग्रेसने तब्बल ३३ जागा मिळवल्या. अशोक चव्हाण यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तिन्ही नगरपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या. त्यापाठोपाठ लातूर जिल्ह्यात २३ जागा मिळवल्या मात्र इतर जिल्ह्यात काँग्रेसला फारशा जागा मिळवता आल्या नाहीत. औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यात काँग्रेसने खातेही उघडले नाही.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com