Nagar Panchayat Election Result 2022: सेना मंत्र्याच्या तालुक्यात राष्ट्रवादीचा गजर

राज्यातील विविध जिल्ह्याचे नगरपंचयात निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत.
Nagar Panchayat Election Result 2022
Nagar Panchayat Election Result 2022saam tv

सातारा : पाटण नगरपंचायत १७ जागांसाठी ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात हाेते. पहिल्या २१ डिसेंबर रोजीच्या टप्प्यात १३ व ता. १८ रोजीच्या दुसऱ्या टप्प्यात ४ जागांसाठी अत्यंत चुरशीने मतदान झाले. राष्ट्रवादी काँग्रेसने काही प्रभागात अपक्षांच्या मैत्रीपूर्ण लढतीचा पॅटर्न राबविला असुन कॉंग्रेस व भाजपचे काही प्रभागात उमेदवार आणि शिवसेनेने १६ प्रभागात आपले उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरवून पाटण नगरपंचायतीच्या (Nagar Panchayat Election) सत्तेसाठी सर्व शक्तीपणाला लावली. आज झालेल्या मतमाेजणीत राष्ट्रवादी काॅंग्रेसला (ncp) सत्ता स्थापनेसाठी माेठे यश आले. शिवसेनेला (shivsena) यंदाच्या निवडणुकीत धक्का बसला आहे. (Nagar Panchayat Elections 2022 Result News)

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंना मोठा धक्का मानला जात आहे. या विभागात शिवसेनेला अवघ्या २ जागा मिळाल्या आहेत. एकुण १७ जागांमध्ये राष्ट्रवादीने सत्ता राखत १५ जागा पटकाविल्या आहेत. शिवसेना दोन जागांवर तर काँग्रेसला व भाजपला खातं देखील खोलता आलेले नाही. (Maharashtra Nagar Panchayat Election Results Live Updates)

Nagar Panchayat Election Result 2022
Nagar Panchayat Elections 2022 Result: नारायण राणेंच्या बालेकिल्यात सेनेस ७ जागा

शिवसेनेचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचा पाटणकर गट अशी ही पारंपारिक लढत होती. या भागात आमदार जरी शिवसेनेचा असला तरी राष्ट्रवादीचा गट मात्र मोठा आहे. त्याचा फायदा (Nagar Panchayat Election Result 2022) राष्ट्रीवादाला झाल्याचे बाेलले जात आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com