Nagar Panchayat Election: दापोली-मंडणगड नगरपंचायतच्या ओबीसी जागांसाठी आज मतदान 

प्रतिष्ठेची असलेल्या दापोली-मंडणगड नगरपंचायतीच्या ओबीसीच्या जागांसाठीचं मतदान आज होत आहे.
Nagar Panchayat Election
Nagar Panchayat ElectionSaam Tv

रत्नागिरी: प्रतिष्ठेची असलेल्या दापोली-मंडणगड नगरपंचायतीच्या ओबीसीच्या जागांसाठीचं मतदान आज होत आहे. मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्या वादात ही निवडणूक अतिशय चुरशीची बनली आहे (Nagar Panchayat Election Voting for OBC seats in Dapoli-Mandangad).

Nagar Panchayat Election
Ajit Pawar On OBC Reservation : "केंद्राने कायद्यात बदल केल्यास ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल", अजित पवार

दापोली (Dapoli) नगरपंचायतीच्या 13 तर मंडणगड नगरपंचायतीच्या 13 जागांसाठीचं मतदान झालंय. ओबीसी आरक्षित जागांसाठीचं मतदान आज होत आहे. दोन्ही नगरपंचायतीत प्रत्येकी चार जागांसाठी हे मतदान (Voting) घेण्यात येत आहे.

दापोली मंडणगड नगरपंचायतीची ही निवडणूक माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा रंगतदार सामना पहायला मिळाला. त्यामुळे आता सत्ता कोणाच्या हाती लागणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहीलं आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com