Nagpur Car Accident : सुसाट कार गेली मजुरांच्या अंगावर; पाच झोपड्या जमीनदाेस्त

झोपड्या तुटून पडल्याने मजुरांचे संसार उघड्यावर
Nagpur Car Accident
Nagpur Car AccidentSaam TV

Nagpur Car Accident News : नागपुरात अनियंत्रित कारचा थरार पाहायला मिळाला आहे. नागपुरातील यशोधरानगर पोलीस हद्दीतील चौकाजवळील वांजरी परिसरात असलेल्या झोपडपट्टीमध्ये शनिवारी (२८ जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास अचकनक अनियंत्रित कार घुसली. त्यामुले परिसरात एकच खळबळ उडाली.

Nagpur Car Accident
Jalna News: धक्‍कादायक..महिलेवर पतीकडून अत्‍याचार; पत्‍नी देत होती झोपडीबाहेर पहारा

या करने पाच झोपड्यांचे नुकसान केले. या घटनेत १५ जण थोडक्यात बचावले असून कारमधील (Car) दोघे जखमी झाले. तर पाच मजूर जखमी झाले आहे. बांबूमध्ये कारचं चाक अडकल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, झोपड्या तुटून पडल्याने मजुरांचे संसार उघड्यावर पडले आहे.

शनिवारी रात्री ६ मुलांसह १५ जण झोपले होते. अन्य तीन झोपड्यांमध्ये झाडू व अन्य साहित्य होते. शनिवारी रात्री कारने दोन जण चिखली पुलाकडून ऑटोमोटिव्ह चौकाकडे जात होते. तेव्हाच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट झोपड्यांमध्ये घुसली. (Nagpur News)

Nagpur Car Accident
Political News : आदित्य ठाकरेंना मोठा धक्का; वरळीतील माजी नगरसेवक शिंदे गटात सामील

एका मागून एक पाच झोपड्या तोडल्यावर कार उलटली. आवाजाने झोपड्यातील नागरिक जागे झाले आणि बाहेर निघाले असता उलटलेल्या कारमध्ये दोन जण जखमी झाल्याचे दिसले. नागरिकांनी कारच्या काचा फोडून त्यांना बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी (Police) जखमींना रुग्णालयात (Hospital) दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com