H3N2 Influenza : राज्यात ‘एच३ एन२’ ने घेतला आणखी एक बळी? या शहरातील संशयित रुग्णाचा मृत्यू

H3N2 Influenza : संपूर्ण राज्याचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
ICMR On H3N2 Virus
ICMR On H3N2 VirusSaam TV

H3N2 Influenza : संपूर्ण राज्याचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. ‘व्हायरल इन्फेक्शन’ असलेल्या ‘एच३एन२’ या विषाणूने देशासह आता महाराष्ट्रातही धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. नागपूरमध्ये H3N2 मुळे एका संशयित रुग्णाचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका ३५ वर्षीय संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  (Latest Marathi News)

ICMR On H3N2 Virus
H3N2 Virus : राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक; आरोग्यमंत्र्यांनीही दिले संकेत

आरोग्य विभागाकडून मात्र यासंदर्भात कुठलीही स्पष्टता झालेली नाही. हृदयाचा गंभीर आजार असलेल्या ३५ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूपूर्वी ‘एच३ एन२’ तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचार सुरू असतानाच १४ मार्च रोजी त्याचा मृत्यू ‘एम्स’मध्ये झाला. गुरुवारी आरोग्य विभागाच्या ‘डेथ ऑडिट’समोर या मृत्यूचे विश्लेषण केल्यावरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

चिताजनक बाब म्हणजे, बुधवारी सुद्धा नागपुरात एका ७८ वर्षीय संशयित रुग्णाचा ‘एच३ एन२’ मुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर आता ३५ वर्षीय संशयित रुग्णाचा अचानक मृत्यू झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.  (Maharashtra Breaking News)

७८ वर्षीय रुग्णावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्राप्त माहितीनुसार, रुग्णाला ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज’ (सीओपीडी), मधुमेह, उच्चरक्तदाबासारख्या सहव्याधी होत्या. उपचार सुरू असताना ९ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांची केलेली ‘एच३एन२’ची तपासणी पॉझिटिव्ह आली. याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाला देण्यात आली.

ICMR On H3N2 Virus
Employee Strike : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात मोठी फूट; या फेडरेशनची माघार, आजपासून कामावर रुजू होणार

राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती होणार?

 राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती होण्याची शक्यता आहे. H3N2 विषाणूचे रुग्ण आढळून येत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आज आरोग्य विभागाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्तीचा निर्णय होण्याची शक्यता आहे

 H3N2 मृत्यू होत नाही. तो रूग्ण 2 दिवसांत बरा होता. आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ज्या ठिकाणी असे संशयित रुग्ण आढळून येतील, त्यांच्यावर उपचार केले जातील. आजार अंगावर काढू नका. खबरदारी घ्या. ताप असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, अंतर पाळा तसेच मास्क वापरा, असं आवाहन तानाजी सावंत यांनी केलं आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com