नागपुर: राष्ट्रवादीच्या नाराजीमुळे कॉंग्रेसला निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता...

"राष्ट्रवादीचं विदर्भातील एकमेव दुकान बंद होईल" या नाना पटोले यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीची नाराजी अजूनही कायम आहे. ही नाराजी आज नागपूरात ही दिसली.
नागपुर: राष्ट्रवादीच्या नाराजीमुळे कॉंग्रेसला निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता...
नागपुर: राष्ट्रवादीच्या नाराजीमुळे कॉंग्रेसला निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता...Saam TV

नागपुर: "राष्ट्रवादीचं विदर्भातील एकमेव दुकान बंद होईल" या नाना पटोले (Nana Patole Congress) यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीची (Rashtrawadi) नाराजी अजूनही कायम आहे. ही नाराजी आज नागपूरात ही दिसली. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून आज काँग्रेसचे (Congress) उमेदवार डॉ. छोटू भोयर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांची अनुपस्थिती होती. 'कॉंग्रेस सोबत जा' असा आदेश पक्षश्रेष्ठींकडून मिळाला नसल्याचं राष्ट्रवादीचे नागपुरातील स्थानिक नेते सांगताहेत. त्यामुळं राष्ट्रवादीची मतं कॉंग्रेस ला मिळेल का? याबाबत अजूनही साशंकता आहे. (Nagpur: Congress is likely to be hit in the election due to NCP displeasure ...)

हे देखील पहा -

काही दिवसांपूर्वी बुलढाण्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी "राष्ट्रवादीचं विदर्भात एकमेव दुकानं आहे, तेही लवकरच बंद होईल" असं वक्तव्य केलं होतं. त्यांनतर राष्ट्रवादीकडून नाना पटोले यांच्यावर टीका करण्यात आली. त्या वक्तव्यानंतर नाना पटोले यांच्यावर राष्ट्रवादीची नाराजी अजूनही कायम आहे. नागपूर विधानसभेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसचे डॉ. छोटू भोयर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, यावेळी राष्ट्रवादीचे नेते अनुपस्थित होते. त्यामुळं त्यांची नाराजी उघडपणे दिसून आली. कॉंग्रेस उमेदवार डॉ. छोटू भोयर यांनी 'राष्ट्रवादी सोबत आहे, असा दावा करत फक्त 'आज सोबत येण्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांचा टायमिंग चुकला' अशा पध्दतीने सावरण्याचा प्रयत्न केला.

नागपुर: राष्ट्रवादीच्या नाराजीमुळे कॉंग्रेसला निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता...
दिग्गजांचा जयंतरावांकडून करेक्ट कार्यक्रम; महाविआ १७, भाजप ६

विधान परिषद निवडणुकीत नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकूण 25 मतं आहेत. आधीच कॉंग्रेसकडे कमी संख्याबळ आहे. त्यात राष्ट्रवादीचे मतं काँग्रेसला नं मिळाल्यास काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळं काँग्रेसला राष्ट्रवादीची नाराजी परवडणारी नाही, त्यांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान काँग्रेस पुढं आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com