Nagpur Corona Update: नागपुरात दोन दिवसात कोरोनामुळे चार मृत्यू, ओमिक्रॉनचा समूह संसर्ग

कोरोनामुळं गेल्या 24 तासात तीन जणांचा मृत्यू झाल्याने नागपूरकरांची चिंता वाढली आहे.
Nagpur Corona Update
Nagpur Corona UpdateSaam Tv

Nagpur Corona Update: नागपूर : कोरोनामुळं गेल्या 24 तासात तीन जणांचा मृत्यू झाल्याने नागपूरकरांची चिंता वाढली आहे. दोन दिवसात चार मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणाही अलर्टवर आहे. तर नागपूर जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजारांवर गेली आहे (Nagpur corona update 1732 new corona patients in last 24 hours).

Nagpur Corona Update
Corona Update : कोरोना टेस्टिंगबाबत माहिती पालिकेला द्यावी, लपवाछपवी रोखण्यासाठी हे नवे नियम लागू

नागपुरात 1,732 नवे कोरोना रुग्ण

गेल्या 24 तासात नागपुरात 1,732 नव्या कोरोना (Corona) रुग्णांची भर पडली आहे. तर पोलीस दलालाही कोरोनाचा विळखा पडला आहे. नागपुरातील 122 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

Nagpur Corona Update
Maharashtra Corona Update: राज्यात 43 हजार 211 नव्या रुग्णांची नोंद

ओमिक्रॉनचा समूह संसर्ग

दुसरीकडे, नागपुरात ओमिक्रॉन (Omicron) चा समूह संसर्ग होत असल्याची माहिती आहे. नागपुरातील कोरोनाबाधितांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे, अशी माहिती 'निरी'च्या अभ्यासात पुढे आली आहे. निरीने 73 कोरोना बाधितांच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग केले. यात सर्व नमुने ओमिक्रॉन पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल पुढे आला. यासाठी गुळणीवर आधारित व्होल जिनोम सिक्वेन्सिंग प्रणालीचा वापर करण्यात आलाय.

राज्यात 43 हजार 211 नव्या रुग्णांची नोंद

राज्यात गेल्या 24 तासात 43,211 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 71,24,278 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच 33,356 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 67,17,125 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या 24 तासात 19 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1,41,756 रुग्णांना कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागला आहे. सध्या राज्यात 2,61,658 रुग्ण सक्रिय आहेत.

ओमिक्रॉन संसर्गाची परिस्थिती

या 24 तासात राज्यात 238 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक 197 रुग्णांची पुण्यात नोंद झाली झाले. आतापर्यंत राज्यात 1605 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे तर 859 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com