Nagpur Corona Update: नागपुरातील निर्बंध अधिक कडक होणार नाहीत, शाळा 26 जानेवारीपर्यंत बंदच - नितीन राऊत

नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, गंभीर रुग्ण फार नाहीत. त्यामुळं निर्बंध अधिक कडक होणार नाही.
Nagpur Corona Update: नागपुरातील निर्बंध अधिक कडक होणार नाहीत, शाळा 26 जानेवारीपर्यंत बंदच - नितीन राऊत
Nagpur Corona UpdateSaam Tv

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, गंभीर रुग्ण फार नाहीत. त्यामुळं निर्बंध अधिक कडक होणार नाही, परिस्थिती बघून निर्णय घेऊ, असं नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तर, येत्या 26 जानेवारीपर्यंत नागपुरातील शाळा बंदच राहणार असंही त्यांनी सांगितलं (Nagpur Corona Update Guardian Minister Nitin Raut Says there is no plan for strict restrictions).

Nagpur Corona Update
Maharashtra Corona Update: चिंताजनक! कोरोनाचा रुग्णांची संख्या पुन्हा 40 हजारांच्या वर

'नागपुरात कोरोनाची स्थिती अत्यंत चिंताजनक'

नागपुरात (Nagpur) कोरोनाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे, त्याच गांभीर्य ओळखणं गरजेचं आहे. लसीकरणाची गती वाढवलीये, चाचण्याही वाढवल्या आहेत. गरजेच्या बाबी रुग्णालयात उपलब्ध करुन दिल्या आहेत. बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासन उपाययोजना आखत आहेत. सोमवारी व्यापारी संघटनांशी चर्चा करणार आहोत. ज्या मनपा झोनमध्ये जास्त रुग्ण वाढतायत, त्यावर नजर ठेऊन आहोत, अशी माहिती नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिली.

Nagpur Corona Update
India Corona Update: काळजी घ्या! देशात 24 तासात 3,37,704 नवे कोरोना रुग्ण

'नागपुरात लसीचा दुसरा डोज 100 टक्के'

नागपुरात लसीचा दुसरा डोज 100 टक्के झालाय. पात्र तरुणाचं 60 टक्के लसीकरण झालंय. ॲाक्सिजन आणि बेड रिकामे नसेल तेव्हा निर्बंध (Restrictions) लावले जातात. पुढील आठवड्यात तरी लोकांचं नुकसान होईल, असे निर्बंध लावणार नाही. मास्क न लावणाऱ्यांवर करडी नजर असणार आहे. जानेवारीच्या शेवटपर्यंत रुग्ण वाढणार, फेब्रुवारीत रुग्णसंख्या स्थिर राहील.

रुग्ण फार वाढले, गरज भासली तर लोकांशी बोलून निर्बंध लावले. मला भेटायला कार्यालयात आलेल्यांची तपासणी केली, त्यापैकी चार जण कोरोना पॅाझिटीव्ह आलेय.

'शाळेबद्दल परिस्थिती बघून निर्णय घेणार'

शाळा लगेच सुरु करणार नाही, 26 जानेवारीपर्यंत परिस्थिती बघून निर्णय घेणार आहोत. परिस्थिती नियंत्रणात आली तर शाळा सुरु करणार. सध्या 17000 बेडपैकी 8 हजार ॲाक्सीजन बेड आहेत.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com