सावधान! कोरोना पुन्हा फोफावतोय; नागपुरात 24 तासांत आढळली मोठी रुग्णसंख्या

बुधवारी जिल्ह्यात तब्बल 50 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.
सावधान! कोरोना पुन्हा फोफावतोय; नागपुरात 24 तासांत आढळली मोठी रुग्णसंख्या
Nagpur Corona Virus latest NewsSaam Tv

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण पुन्हा एकदा वाढण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. बुधवारी जिल्ह्यात तब्बल 50 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. चिंताजनक बाब म्हणजे यातील निम्मे रुग्ण हे ग्रामीण भागातील आहे. माहितीनुसार, बुधवारी जिल्ह्यात अनेकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 2.45 टक्के रुग्णांना कोरोनाचे निदान झाले. (Nagpur Corona Virus Latest News)

Nagpur Corona Virus latest News
गोंदिया जिल्ह्यात कोरोनाची पुन्हा 'एंट्री'; 24 तासांत आढळले 5 रुग्ण

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना सकारात्मक अहवालाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. शहरात दिवसभरात एकूण 2 हजार 33 संशयितांच्या चाचण्या झाल्या. त्यापैकी 50 जणांना कोरोना लागण झाल्याचं समोर आलं. दरम्यान, बुधवारी करण्यात आलेल्या एकूण चाचण्यांच्या तुलनेत सकारात्मक अहवालाचे प्रमाण 1.33 टक्के, ग्रामीण 6.18 टक्के आणि जिल्ह्यात 2.45 टक्के नोंदवले गेले.

चिंताजनक बाब म्हणजे 13 जूनपासून ग्रामीण भागात नवीन रुग्णसंख्या एक अंकी होती. परंतु बुधवारी ती दोन आकडी (24) इतकी झाली. दरम्यान, एकाच दिवशी जिल्ह्यात 50 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 253 इतकी झाली आहे.

Nagpur Corona Virus latest News
Corona In Maharashtra: महाराष्ट्राभोवतीचा कोरोनाचा विळखा होतोय घट्ट, २४ तासांत चित्र पालटले

शहरात दिवसभरात 8 रुग्ण, ग्रामीण भागात 8 रुग्ण, जिल्ह्याबाहेरील 3 असे एकूण 16 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांच्या तुलनेत नव्या बाधितांची संख्या जास्त आहे. बुधवारी शहरात एकूण 253 सक्रिय कोरोनाग्रस्त नोंदवले गेले. यापैकी 3 गंभीर रुग्णांवर मेडिकलच्या कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com