PMO कार्यालयात वट असल्याचे सांगत डाॅक्टराची साडेचार कोटींची फसवणूक; अखेर Ajit Parse अटकेत

पारसे विरुद्ध आतापर्यंत दोघांनीच फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
nagpur, police, social media, ajit parse
nagpur, police, social media, ajit parseSaam Tv

Nagpur Crime News : नागपूरात अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या स्वयंघोषित सोशल मीडिया तज्ज्ञ अजित पारसे (ajit parse) याला अखेर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने (nagpur local crime branch) अटक केली. तब्बल सहा महिन्यानंतर अजित पारसेला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. (Maharashtra News)

nagpur, police, social media, ajit parse
Shirdi Latest News : साईंच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी 'ही' गाेष्ट लक्षात ठेवा, तुमचाच हाेईल फायदा

नागपूरचे डॉक्टर राजेश मुरकुटे यांना होमिओपॅथी महाविद्यालय काढण्यासाठी सीएसआर निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. थेट पीएमओमध्ये ओळखी असल्याचे सांगत डॉक्टर मुरकुटे यांना अजित पारसेने तब्बल साडेचार कोटी रुपयांचा गंडा घातला.

यासाठी त्याने कधी इन्कमटॅक्स तर कधी सीबीआय चौकशीची बतावणी केली. तर कधी हायप्रोफाईल व्यक्तींच्या नावे धमकी देखील दिली. डॉक्टर मुरकुटे यांच्या तक्रारीनंतर 22 ऑक्टोबर 2022 मध्ये अजित पारसेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात बनावट लेटरहेड, स्टॅम्प पेपर, पोलिसांचे रबर स्टॅम्प जप्त करण्यात आले होते.

nagpur, police, social media, ajit parse
Nitin Gadkari's Panvel Speech: खरोखर मी थकलाेय आता, इजा...बिजा.. आता तिजा असं का म्हणाले नितीन गडकरी (पाहा व्हिडिओ)

दरम्यान अटक टाळण्यासाठी पारसे रुग्णालयात दाखल झाला होता. तसेच त्याने आत्महत्या करण्याचे नाटक देखील केले होते. पारसे विरुद्ध आतापर्यंत दोघांनीच फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

त्याने शहरातील अनेकांना गंडा घातल्याची चर्चा आहे, मात्र बदनामीच्या भीतीपोटी तक्रारदार समोर आले नाहीत. ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी समोर यावे असं आवाहन राहुल शिरे ( पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा) यांनी केेले आहे.

nagpur, police, social media, ajit parse
Kanda Anudan News : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; अनुदानासाठी 'या' तारखेपर्यंत अर्ज करता येणार

दरम्यान गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर पारसेला पाेलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास 11 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून अनेक गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com