Crime News : पत्नीच्या चारित्र्यावर संशय; दोन दिवसांच्या बाळाला थेट फरशीवर आपटलं, निर्दयी बापाला अटक

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका नराधम बापाने आपल्या दोन दिवसांच्या बाळाला थेट फरशीवर आपटलं.
Nagpur Crime News
Nagpur Crime News Saam Tv

Nagpur Crime News : नागपूर शहरातून एक संतापजक घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका नराधम बापाने आपल्या दोन दिवसांच्या बाळाला थेट फरशीवर आपटलं. या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.  (Latest Marathi News)

Nagpur Crime News
Viral News : मटण खाण्यासाठी आला अन् सासूला घेऊन पळाला; जावयाचं प्रताप पाहून पोलिसही चक्रावले!

प्राप्त माहितीनुसार, नागपूरच्या मेडिकल या शासकीय रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक ४६ मध्ये ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी या नराधम बापास अटक केली आहे.

गिरीष गोंडाने असं निर्दयी बापाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरच्या मेडिकल या शासकीय रुग्णालयातील वार्ड क्रमांक ४६ मध्ये एक महिला उपचारासाठी दाखल झाली होती.

Nagpur Crime News
Jalna Crime : भयंकर! ट्रॅक्टरखाली चिरडून पत्नीची हत्या; नंतर रचला अपघाताचा बनाव, पतीचं क्रूर कृत्य

यावेळी या महिलेचा पती गिरीष हा तिथे आला. दोघांमध्ये काही कारणास्तवरून बाचाबाची झाली. या बाचाबाचीत आरोपी गिरीश याने आपल्या दोन महिन्यांच्या बाळाला उचलून घेत थेट फरशीवर आपटलं.

या घटनेत बाळाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी निर्दयी बापाला अटक केली आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com