Nagpur : मुलीचे प्रेमसंबंध समजल्याने वडिलांनी घर बदलले; प्रियकराच्या भयंकर कृत्याने नागपुरात खळबळ

घर बदलले या रागातून आरोपीने एकाची भर रस्त्यात धारदार शस्त्रांनी भोसकून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने नागपुरात खळबळ माजली आहे.
nagpur crime news
nagpur crime newssaam tv

नागपूर : नागपूरच्या नारायण द्विवेदी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. मृतक नारायण यांच्या अल्पवयीन मुलीचे घरमालकाच्या आरोपी मुलासोबत प्रेम संबंध होते. याची कुणकुण नारायण यांना लागली, त्यामुळे त्यांनी घर बदलले या रागातून आरोपीने त्यांची भर रस्त्यात धारदार शस्त्रांनी भोसकून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने नागपुरात (nagpur) खळबळ माजली आहे. (Nagpur Crime News In Marathi )

nagpur crime news
पुण्यात आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सहा लाखांची फसवणूक

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी शहरातील गिट्टीखदान परिसरात पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या जवळ नारायण द्विवेदी यांची भर रस्त्यात हत्या झाली होती. नारायण यांची हत्या त्यांच्या जुन्या घर मालकाच्या २० वर्षीय मुलानेच केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी बलराम पांडे या घर मालकाचा मुलाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलराम पांडे याचे नारायण द्विवेदी यांच्या अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. तो सतत द्विवेदी यांच्या मुलीचे पाठलाग करायचा,छेड काढायचा. याच मुद्यावरून नारायण द्विवेदी यांनी एक दोन वेळेला बलरामला समजावले होते. त्यांनी बलरामच्या वडिलांना ही माहिती दिली होती. दरम्यान, पोलिसांनी (Police) या प्रकरणी द्विवेदी कुटुंबीयांकडून त्यांच्या अल्पवयीन मुलीची आरोपीकडून छेडखानी केली जात असल्याची कोणतीही तक्रार पोलिसांकडे केली नव्हती असा दावा केला आहे.

nagpur crime news
Jalgaon: भीषण अपघात; दोन सख्‍ख्‍या भावांचा मृत्‍यू

नेमक काय घडलं ?

रविवारी सकाळी नारायण द्विवेदी हे शहरातील गजबजलेल्या काटोल रस्त्यावर सकाळी हे दुचाकीने ड्युटीवर जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. आरोपींनी नारायण द्विवेदी यांच्यावर अनेक वार केल्याने ते दुचाकीसह रस्त्यावरचं कोसळले,त्यात त्यांचा मृत्यू झाला. आरोपींनी नारायण गयाप्रसाद द्विवेदी यांची हत्या केल्यानंतर मृतदेहाचा मोबाईलवर फोटो काढला होता. नारायण द्विवेदी यांची हत्या झाल्यानंतर घर मालकाच्या मुलाचे वर्तन योग्य नसल्याने घर रिकामे केले होते. त्या वादातून हत्या झाल्याचा संशय नारायण यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता. आज त्यांच्या हत्येचे कारण उघडकीस आल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com