Nagpur News: नातेवाईकांकडूनच तरुणीवर अत्याचार; व्हिडीओ वायरल करण्याची धमकी

नातेवाईकांकडूनच तरुणीवर अत्याचार; व्हिडीओ वायरल करण्याची धमकी
Nagpur Crime News
Nagpur Crime NewsSaam tv

नागपूर : तरुणीवर अत्याचार करून त्याचा व्हिडीओ वायरल करण्याची धमकी देत दोन नातेवाईकांनी अत्याचार केला. नंदनवन पोलीस (Police) स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना (Crime News) अटक केली आहे. यात पीडित तरुणीच्या बहिणीच्या नवऱ्याचा समावेश आहे. मोहम्मद अरसलान शेख आणि मोहम्मद सरफराज अशी अटक केलेल्या आरओपीची नावे आहेत. (Tajya Batmya)

Nagpur Crime News
Beed: पाणी आणण्यासाठी गेलेल्या मायलेकराचा मृत्यू; विहिरीत पडलेल्‍या मुलासाठी आईने मारली उडी

नंदनवन (Nagpur News) पोलीस स्टेशन हद्दीत पीडित तरुणी राहते. २०२१ मध्ये पीडितेच्या मोठ्या बहिणेच्या लग्नाचे बोलणे सुरु होते. या दरम्‍यान आरोपी मोहम्मद अरसलान याची ओळखी पीडितेशी झाली. एक दिवस आरोपीने पीडित तरुणीवर (Crime) अत्याचार केला. अत्याचाराचा व्हिडीओ वायरल करण्याची धमकी देत अनेकदा त्याने पिडीतेवर अत्याचार केला.

बहिणीशी लग्न] तरीही अत्‍याचार

पीडितेच्या बहिणीशी लग्नानंतरही त्याने हा प्रकार सुरूच ठेवला. या प्रकरणाची माहिती आरोपीच्या मामेभावाला समजल्यावर त्यानेही व्हिडीओ वायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला. अखेर पीडित तरुणीने कुटुंबियांना माहिती दिल्यावर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करीत दोन्ही आरोपींना अटक केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com