नोकरीचे आमिष दाखवत उच्चशिक्षित तरुणीवर अत्‍याचार; संशयित ताब्‍यात

नोकरीचे आमिष दाखवत उच्चशिक्षित तरुणीवर अत्‍याचार; संशयित ताब्‍यात
Nagpur Crime
Nagpur CrimeSaam tv

नागपूर : शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. नोकरी लावण्याच्या बहाण्याने एका तरुणीवर अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. अंबाझरी पोलिसांनी (Police) आरोपी नीलेश योगेश्वर हेडाऊ या संशयिताला अटक केली आहे. (nagpur crime news Atrocities on young women showing job lure)

Nagpur Crime
टॉयलेट घोटाळा; चार संशयित गजाआड, मुख्‍य आरोपी फरारच

अंबाझरी येथे राहणारी २४ वर्षीय तरुणी (Nagpur News) नोकरीच्या शोधात बहिणीसह सीताबर्डी येथे आली होती. दोघी बहिणी मोरभवन बसस्थानकावर नोकरीबाबत चर्चा करत होत्या. त्याच्याजवळ उभ्या असलेल्या आरोपी (Crime News) नीलेशने त्याचे बोलणे ऐकले आणि आपल्याकडे नोकरी असल्याचे आमिष त्यांना दाखवले. स्वत:ची ओळख हॉटेल मालक अशी करून दिली. आरोपीने तरुणीकडून मोबाइल क्रमांकही घेतला.

हॉटेलवर जॉब असल्‍याचे सांगत अत्‍याचार

संशयित आरोपी नीलेशने तरुणीला फोन करून गणेशपेठ बसस्थानकावर बोलावत तिला एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिज म्हणून जॉब आहे. त्याच्या मुलाखतीसाठी जायचे आहे. त्यानंतर तरुणीला भंडारा येथे घेऊन गेला. तेथे त्याने तिथे मुलीवर जबरदस्ती केली. नीलेशने तिला पुन्हा घरात नेऊन अत्याचार केला. रात्रभर ओलिस ठेवल्यानंतर आरोपीने तरुणीला गणेशपेठ बसस्टँडजवळ सोडत झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला ठार मारीन म्हणून धमकावले. घरी आल्यानंतर पीडित मुलीने झालेला प्रकार आपल्या बहणीला सांगितला. त्यानंतर तरुणीने अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपी नीलेश हेडाऊ असल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक करण्यात आली. अंबाझरी पोलिसांनी नीलेशला तत्काळ अटक केली. त्याच्यावर अत्याचार आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com