नागपूर हादरले, अल्पवयीन मुलीची अत्याचारानंतर केली हत्या

नागपूर हादरले, अल्पवयीन मुलीची अत्याचारानंतर केली हत्या
नागपूर हादरले, अल्पवयीन मुलीची अत्याचारानंतर केली हत्या
Crime NewsSaam tv

नागपूर : जिल्‍ह्यातील मौदा येथे इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी मौदा पोलिसांनी (Police) आरोपीला अटक केली आहे. आरोपीने दिलेली माहिती आणि प्राथमिक तपासात ही घटना प्रेम प्रकरणातुन घडली (Crime News) असल्याचा स्पष्ट झाले आहे. त्या आधारे पोलिस तपास करत आहेत. (nagpur crime news Murder case girl after torture)

Crime News
२० फूट पुलावरून पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यु; रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात

सदर प्रकरणातील अल्पवयीन विद्यार्थिनी ही १५ वर्षांची आहे. ती शिकवणी वर्ग झाल्यानंतर घरी परत जात असताना आरोपी धीरज शेंडे याने तिला बळजबरीने त्याच्या मोटरसायकलवर बसवले. त्यानंतर आरोपीने तिला कुही शिवारातील साळवा (Nagpur News) जंगलात नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. ही घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. त्यानंतर मौदा पोलिसांनी तपास सुरू केला असता यामध्ये मौदा येथील भामेवाडा येथील धीरज सुरेश शेंडे नामक आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

इन्‍स्‍ट्राग्रामवरून ओळख

सदर प्रकरणातील आरोपी धीरज सोबत मुलीची ओळख ही इन्स्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. मात्र ती मुलगी दुसऱ्या मुलाच्या संपर्कात असल्याची माहिती समजल्‍याने संतापलेल्या आरोपीने तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली असल्याचे आता उघड झाले आहे. सावळा जंगलात अल्पवयीन मुलीचा रक्ताच्या थारोळ्यातला मृतदेह आढळून आल्यानंतर मौदा पोलिसांनी तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com