
Nagpur Petrol Pump Owner Murder CCTV Video: गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यातील बहुतांश गुन्हे खंडणी, लूटमार सारख्या घटनेत घडत आहेत. अगदी दोन दिवसांपूर्वी भिवापूर ते नागभीड रोडवर असलेल्या पाटील पेट्रोल पंपवर तिघांनी पंपचालकाचा चाकूने हल्ला करून खून करीत लुटमार केली. (Breaking Marathi News)
या थरारक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. दिलीप राजेश्वर सोनटक्के (रा. दिघोरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भिवापूर ते नागभीड रोडवर (Nagpur) दिलीप सोनटक्के यांचे पाटील पेट्रोल पंप आहे.
बुधवारी सकाळी १० वाजता दिलीप हे कार्यालयात इंधनविक्रीचे पैसे मोजत होते. दरम्यान, दुचाकीवरून तीन युवक आले. त्यांनी दिलीप यांना पिस्तूल दाखवली आणि १ लाख ३४ हजार रुपये हिसकले. दिलीप यांनी प्रतिकार केला असता आरोपींनी त्यांच्यावर चाकूने हल्ला (Crime News) केला. आरोपींनी २९ सेंकदात दिलीप यांच्यावर चाकूने सपासप १९ वार केले.
या थरारक घटनेचं सीसीटीव्ही (CCTV Video) फुटेज समोर आलं आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, दिलीप हे पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांसोबत पैसे मोजत आहेत. अचानक तिथे तीन आरोपी येतात. काही कळण्याच्या आतच ते दिलीप यांच्यावर हल्ला चढवतात.
यावेळी कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली असता त्यांनाही ठार मारण्याची धमकी दिली. तीनही आरोपींनी दुचाकीने उमरेडच्या दिशेने पळ काढला. या प्रकरणाची पोलीस (Police) अधीक्षक विशाल आनंद यांनी गांभीर्याने दखल घेऊन जिल्ह्यात नाकाबंदी केली.
उपविभागीय अधिकारी संजय पुरंदरे यांच्या नेतृत्वात निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी तीनही आरोपींना चार तासांत अटक केली. शेख अफरोज (ताजबाग), मोहम्मद वसीम सोनू (२७, खरबी) आणि शेख जुबेर (मोठा ताजबाग) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून १ लाख ३४ हजार रुपये, पिस्तूल, काडतूस जप्त करण्यात आले. तिघांनीही खुनाची कबुली दिली आहे.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.