Nagpur Crime News : रिक्षाचालक की सैतान? भररस्त्यातून तरुणीचं अपहरण; नंतर केलं भयानक कांड, संतापजनक घटना!

नागपूर शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथे एका रिक्षाचालकाने मतिमंद तरुणीचे अपहरण केले.
Ajani Police Station
Ajani Police StationSaam TV

Nagpur News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. अत्याचार करणाऱ्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे. अशातच नागपूर शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथे एका रिक्षाचालकाने मतिमंद तरुणीचे अपहरण केले. (Latest Marathi News)

त्यानंतर अज्ञातस्थळी नेत तिच्यावर बलात्कार (Crime News) केला. ही धक्कादायक घटना शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Ajani Police Station
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढणार? निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल, काय आहे प्रकरण?

मुकेश सुधाकर हेजीब (वय ४० वर्ष, राहणार गोंदिया), असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी नागपूर (Nagpur) शहरातील अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. २५ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास ती घराजवळील दुकानात चॉकलेट आणायला गेली. मात्र, बराच वेळ होऊनही ती घरी परत आली नाही.

मुलगी घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला व दुसऱ्या दिवशी अजनी पोलिस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. यादरम्यान त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ती मुलगी घरी परत आली.

Ajani Police Station
Satara Pune Highway : चहासाठी टपरीवर थांबले, पण थेट मृत्युने गाठलं; भीषण अपघातात दोघांनी गमावला जीव, ५ जखमी

तिच्या कुटुंबीयांनी विचारणा केली असता अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतच राहणारा ऑटोचालक मुकेशने तिला ऑटोत बसवून नेल्याचे तिने सांगितले. तिला आणखी सखोल विचारले असता त्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची बाब समोर आली.

त्याने याअगोदरदेखील असेच संतापजनक कृत्य केल्याची माहिती तिने दिली. हे ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालील जमीनच सरकली. तिच्या आईने अजनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी (Police) तिची वैद्यकीय तपासणी केली व ऑटोचालकाविरोधात गुन्हा नोंदविला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, चौकशी सुरू आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com